व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण प्रदान
3 कर्तृत्ववान व्यक्तींना पद्मविभूषण : मिथून चक्रवर्तीसमवेत 17 जणांना पद्मभूषण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रपती भवनात सोमवारी संध्याकाळी पद्मपुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्यासमवेत 3 जणांचा पद्मविभूषणने गौरव करण्यात आला आहे. तर 110 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. पद्मपुरस्कार सोहळ्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, विदेशमंत्री एस. जयशंकर उपस्थित होते. या पुरस्कार विजेत्यांची नावे 25 जानेवारी रोजी घोषित करण्यात आली होती. यातील निम्म्या जणांना सोमवारी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर उर्वरित मान्यवरांचा पुढील आठवड्यात गौरव केला जाणार आहे.
सर्वप्रथम माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर) आणि पद्मा सुब्रमण्यम यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. बिंदेश्वर पाठक यांच्या पत्नी अमोला पाठक यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे. यानंतर अभिनेता मिथून चक्रवर्ती, गायिका उषा उथुप, सीताराम जिंदल, माजी राज्यपाल राम नाईक यांच्या समवेत 17 जणांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मनोहर कृष्ण डोले तसेच रामचेत चौधरी यांच्यासह 110 जणांना पद्मश्ा़dरीने गौरविण्यात येणार आहे.
आसामच्या रहिवासी आणि देशाच्या पहिल्या महिला माहूत पार्वती बरुआ आणि जागेश्वर यादव, चामी मुर्मू, सोमण्णा, सर्वेश्वर, सांगथाम, समवेत अनेक कर्तबगारांचा पद्मपुरस्काराने गौरव झाला आहे. पद्मपुरस्कार विजेत्यांमध्ये 30 महिलांचा समावेश आहे. तर यातील 8 जण विदेशी/एनआरआर/पीआयओ/ओसीआर श्रेणीचे लोक आहेत. 9 कर्तबगारांचा मरणोत्तर गौरव करण्यात आला आहे.
Home महत्वाची बातमी व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण प्रदान
व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण प्रदान
3 कर्तृत्ववान व्यक्तींना पद्मविभूषण : मिथून चक्रवर्तीसमवेत 17 जणांना पद्मभूषण वृत्तसंस्था/ नवी दिल्ली राष्ट्रपती भवनात सोमवारी संध्याकाळी पद्मपुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्यासमवेत 3 जणांचा पद्मविभूषणने गौरव करण्यात आला आहे. तर 110 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. पद्मपुरस्कार सोहळ्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र […]