अजब पाचगाव ग्रामपंचायतचा गजब कारभार; पाणीपुरवठ्यातून ग्रामपंचायतचा वार्षिक 50 लाखांचा

पाचगाव वार्ताहर पाचगाव ग्रामपंचायतच्या वतीने मूळ पाचगाव आणि पश्चिम भागातील उपनगरांना पाणीपुरवठा करण्यात येतो. ग्रामपंचायतीने खरेदी केलेले पाणी आणि ग्रामस्थांना विक्री करून पुरवलेले पाणी यामधून ग्रामपंचायतीला वार्षिक सुमारे 50 लाख रुपये तोटा होत आहे. ग्रामपंचायतीच्या या भोंगळ कारभारामुळे ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचा भुर्दंड बसत आहे. दोन योजने मधून ग्रामपंचायतची पाणी खरेदी पाचगाव ग्रामपंचायत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण […]

अजब पाचगाव ग्रामपंचायतचा गजब कारभार; पाणीपुरवठ्यातून ग्रामपंचायतचा वार्षिक 50 लाखांचा

पाचगाव वार्ताहर

पाचगाव ग्रामपंचायतच्या वतीने मूळ पाचगाव आणि पश्चिम भागातील उपनगरांना पाणीपुरवठा करण्यात येतो. ग्रामपंचायतीने खरेदी केलेले पाणी आणि ग्रामस्थांना विक्री करून पुरवलेले पाणी यामधून ग्रामपंचायतीला वार्षिक सुमारे 50 लाख रुपये तोटा होत आहे. ग्रामपंचायतीच्या या भोंगळ कारभारामुळे ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचा भुर्दंड बसत आहे.
दोन योजने मधून ग्रामपंचायतची पाणी खरेदी
पाचगाव ग्रामपंचायत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि गिरगाव पाणी योजनेतून पाणी खरेदी करते. पाचगाव ग्रामपंचायत कडे एकूण 3600 पाणी घेणाऱ्या ग्राहकांची नोंद आहे.
महिन्याचा ग्रामपंचायतीचा पाण्यासाठीचा खर्च
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत पाचगाव ग्रामपंचायतला महिन्याला सुमारे सहा लाख रुपये पाणी बिल देण्यात येते. तर गिरगाव पाणीपुरवठा योजनेसाठी महिन्यासाठी सरासरी दोन लाख 50 हजार रुपये पाणी बिल भरावे लागते. पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाईट साठीचे बिल महिन्यला सुमारे 55 हजार रुपये येते. पाणी शुद्धीकरणासाठी महिन्याकाठी सुमारे 35 हजार रुपये खर्च येतो. ग्रामपंचायत पाण्याची गळती काढण्यासाठी महिन्याला सुमारे 60 हजार रुपये खर्च करते.
भोंगळ कारभारामुळे पाचगाव ग्रामपंचायतचे लाखो रुपये पाण्यात
ग्रामपंचायतीच्या योग्य नियोजना अभावी ग्रामपंचायतचा दरवर्षी लाखो रुपयांचा करून तोटा होत आहे. हे पैसे ग्रामस्थांनी विविध करांच्या रूपातून भरलेले असतात. या पैशांचा पाचगावच्या विकासासाठी उपयोग करता आला असता. मात्र ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळत नाही आणि ग्रामपंचायतचे लाखो रुपये ही वाया जात असल्याचे मत भिकाजी गाडगीळ यांनी व्यक्त केले. प्राधिकरण कडून ग्रामपंचायतला अंदाजे पाणी आणि अंदाजे पाणी बिल देण्यात येते.