वैद्यकीय क्षेत्रात आपला देश प्रगतिपथावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड : आयसीएमआर-एनआयटीएमचा स्थापनादिन उत्साहात बेळगाव : पारंपरिक औषध संशोधन क्षेत्रामध्ये जगाचे लक्ष भारताकडे आहे. वैद्यकीय क्षेत्रात आपण प्रगती करत असून ही घोडदौड कायम ठेवण्याचे आव्हान संशोधक, वैज्ञानिकांवर आहे, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सांगितले. राज्यपाल थावरचंद गेहलोत, सुदेश धनखड, आयसीएमआरच्या संचालक डॉ. सुवर्णा रॉय यावेळी उपस्थित होते. आयसीएमआर-एनआयटीएमच्या 18 व्या स्थापनादिन कार्यक्रमात […]

वैद्यकीय क्षेत्रात आपला देश प्रगतिपथावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड : आयसीएमआर-एनआयटीएमचा स्थापनादिन उत्साहात
बेळगाव : पारंपरिक औषध संशोधन क्षेत्रामध्ये जगाचे लक्ष भारताकडे आहे. वैद्यकीय क्षेत्रात आपण प्रगती करत असून ही घोडदौड कायम ठेवण्याचे आव्हान संशोधक, वैज्ञानिकांवर आहे, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सांगितले. राज्यपाल थावरचंद गेहलोत, सुदेश धनखड, आयसीएमआरच्या संचालक डॉ. सुवर्णा रॉय यावेळी उपस्थित होते. आयसीएमआर-एनआयटीएमच्या 18 व्या स्थापनादिन कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, कोव्हिड काळात प्रत्येक भारतीयाने सहकार्य करून कुशलतेने परिस्थितीवर मात केली आहे. ही भारताची संस्कृती आहे. कोव्हिडवर उपचार आणि प्रतिबंध करण्यात आयसीएमआरचे कार्य वादातीत आहे. देशातील प्रत्येक नागरिकावर देशाचे आरोग्य अवलंबून असते. म्हणूनच प्रत्येकाने सुदृढ व्हावे व 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकारावे, असे आवाहनही त्यांनी केले. एक वेळ अशी होती की, भारताची अर्थव्यवस्था लंडन आणि पॅरिसपेक्षा मागे होती. मात्र, आता भारत जगातील पाचवी मोठी अर्थसत्ता म्हणून उदयास आला आहे. आयुर्वेद, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी, योग व आयुष प्रणाली ही भारताची शान आहे. संसर्गजन्य रोग आटोक्यात आणण्यामध्ये पारंपरिक औषधांची भूमिका महत्त्वाची आहे. तितकेच आयसीएमआरचे कार्यही महत्त्वाचे आहे.
संशोधनाचे शास्त्रज्ञांसमोर आव्हान
आयसीएमआरचा हा 18 वा स्थापना दिन आहे. हे वय म्हणजे एक मोठा टप्पा आहे. आज पारंपरिक औषध संशोधनाचे आव्हान शास्त्रज्ञांसमोर आहे. मधुमेहासह विविध आरोग्य समस्यांवर पारंपरिक औषधे शोधणे गरजेचे आहे. देशातील आयुष विभाग खूप चांगले काम करत आहे. फार्मास्युटिकल क्षेत्रात संशोधन करून विकासासाठी हातभार लावण्याची गरज आहे. वैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्या संशोधनामुळे देशाच्या आर्थिक विकासालाही मदत होईल. आज नवनवीन आजार उदयास येत आहेत. जनजागृती करून समाज निरोगी ठेवण्यासाठी आयसीएमआरने कार्यरत राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वनौषधी तयार करण्याचा प्रयत्न
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी कोव्हिड लस विकसित करण्यात आयसीएमआरची भूमिका महत्त्वाची आहे. या संस्थेने पश्चिम घाटातील वनौषधी तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे सांगितले. आयसीएमआरच्या सहसचिव अनु नागर यांनी स्वागत केले. जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद तसेच संशोधक व शास्त्रज्ञ उपस्थित होते.