आमदार राजू सेठ यांच्याकडून ‘जनता दरबार’चे आयोजन

सागर कॉलनीमधील समस्या घेतल्या जाणून : लवकरच सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार राजू सेठ यांच्याकडून जनता दरबार भरविला जात आहे. सागर कॉलनी, कणबर्गी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बुधवारी जनता दरबार भरविण्यात आला होता. यावेळी नागरिकांनी सागर कॉलनी परिसरात असणाऱ्या असुविधांची आमदारांना माहिती दिली. मतदारसंघातील समस्या […]

आमदार राजू सेठ यांच्याकडून ‘जनता दरबार’चे आयोजन

सागर कॉलनीमधील समस्या घेतल्या जाणून : लवकरच सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन
बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार राजू सेठ यांच्याकडून जनता दरबार भरविला जात आहे. सागर कॉलनी, कणबर्गी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बुधवारी जनता दरबार भरविण्यात आला होता. यावेळी नागरिकांनी सागर कॉलनी परिसरात असणाऱ्या असुविधांची आमदारांना माहिती दिली. मतदारसंघातील समस्या जाणून घेण्यासाठी आमदार राजू सेठ यांनी जनता दरबार सुरू केला आहे. प्रत्येक नागरिकाला आपल्या समस्या आमदारांपुढे मांडता येत असल्याने जनता दरबारला उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. सागर कॉलनी येथे येत्या काही दिवसात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार सेठ यांनी दिले.
क्रीडासंकुल खुले करणार
अशोकनगर येथील क्रीडासंकुल अनेक दिवसांपासून बंद आहे. बॅडमिंटन कोर्ट, स्वीमिंग पूल नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. आमदार सेठ यांनी क्रीडा संकुलाची पाहणी करून लवकरच नागरिकांसाठी खुले करणार असल्याचे सांगितले. इमारतीचा योग्य वापर व्हावा, यासाठी नूतनीकरण करण्यास आपण इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी परिसरातील आसद खान सोसायटीला भेट देऊन रस्ते व इतर सुविधांचा आढावा घेतला.

Go to Source