मजगाव परिसरातील मंदिरांत पूजन-प्रसादाचे आयोजन

बेळगाव : श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनानिमित्त मजगाव परीसरात अनेक मंदिरात पूजन प्रसादाचे आयोजन केले होते. अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठानिमित्त संपूर्ण मजगाव परिसर भगव्या पताका, स्वागतकमानी, रांगोळ्या, तोरणे, लायटिंग, दीपोत्सवाने सर्व मंदिरे झगमगून गेली आहेत. प्रत्येक मंदिरांत अभिषेक, पूजन, भजन, हनुमान चालीसा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मजगावात दि.21 रोजी सायंकाळी श्रीराम मंदिर प्रतिकृती व राममूर्तीची मिरवणूक […]

मजगाव परिसरातील मंदिरांत पूजन-प्रसादाचे आयोजन

बेळगाव : श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनानिमित्त मजगाव परीसरात अनेक मंदिरात पूजन प्रसादाचे आयोजन केले होते. अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठानिमित्त संपूर्ण मजगाव परिसर भगव्या पताका, स्वागतकमानी, रांगोळ्या, तोरणे, लायटिंग, दीपोत्सवाने सर्व मंदिरे झगमगून गेली आहेत. प्रत्येक मंदिरांत अभिषेक, पूजन, भजन, हनुमान चालीसा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मजगावात दि.21 रोजी सायंकाळी श्रीराम मंदिर प्रतिकृती व राममूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. तसेच सर्व मंदिरांत सोमवारी पूजन करून प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.