शहरातील विविध समस्या सोडविण्याचे आदेश
आमदार राजू सेठ यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांची घेतली बैठक
बेळगाव : शहरातील विविध समस्यांसंदर्भात आमदार राजू सेठ यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. खाऊ कट्ट्यांमधील काही गाळेधारकांनी व्यवसाय परवाना महापालिकेकडून घेतला नाही. त्यांना नोटीस बजावण्याचा आदेश आमदार राजू सेठ यांनी दिला आहे. आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांना हा आदेश देण्यात आला. त्यानंतर अनेक ठिकाणी युजीडी तसेच पे टॉयलेटच्या समस्या वाढल्या आहेत. त्या दूर करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये ड्रेनेजची समस्या काही ठिकाणी गंभीर बनत चालली आहे. त्याबाबत तातडीने महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही समस्या सोडवावी, असे आमदार राजू सेठ यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. शहरामध्ये स्वच्छतागृहांची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे. स्वच्छतागृहे महानगरपालिकेकडे दिली तर समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे इतर एखाद्या संस्थेला चालविण्यासाठी स्वच्छतागृह द्यावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. शहरामध्ये ड्रेनेजची समस्या गंभीर बनत चालली आहे. ती दूर करण्यासाठी उपाय योजना करा, वारंवार समस्या उद्भवत असतात. त्याकडे अधिक लक्ष देऊन ड्रेनेजची समस्या सोडवावी, असे सांगितले. पाण्याची समस्या यावर्षी निर्माण होणार आहे. त्यामुळे शहरातील 58 वॉर्डांमध्ये बंद असलेल्या कूपनलिकांची दुरुस्ती करून पाणी सुरू करावे, असे सांगण्यात आले. बैठकीला विरोधी गटाचे गटनेते मुज्जम्मील डोणी, उपायुक्त उदयकुमार तळवार, लक्ष्मी निपाणीकर, नगरसेवक रवी साळुंखे, पालकमंत्र्यांचे सचिव मल्लगोंडा पाटील यांच्यासह इतर नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी शहरातील विविध समस्या सोडविण्याचे आदेश
शहरातील विविध समस्या सोडविण्याचे आदेश
आमदार राजू सेठ यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांची घेतली बैठक बेळगाव : शहरातील विविध समस्यांसंदर्भात आमदार राजू सेठ यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. खाऊ कट्ट्यांमधील काही गाळेधारकांनी व्यवसाय परवाना महापालिकेकडून घेतला नाही. त्यांना नोटीस बजावण्याचा आदेश आमदार राजू सेठ यांनी दिला आहे. आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांना हा आदेश देण्यात आला. त्यानंतर अनेक ठिकाणी युजीडी तसेच पे […]