हिडकल जलाशयातून घटप्रभा नदीत पाणी सोडण्याचा आदेश

जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती बेळगाव : बागलकोट जिल्ह्यामध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याने हिडकल जलाशयातून घटप्रभा नदीपात्रात 2 टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिला आहे. बागलकोट जिल्ह्यामध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.  यासाठी दि. 19 पासून हिडकल जलाशयातून घटप्रभा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्याची सूचना […]

हिडकल जलाशयातून घटप्रभा नदीत पाणी सोडण्याचा आदेश

जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती
बेळगाव : बागलकोट जिल्ह्यामध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याने हिडकल जलाशयातून घटप्रभा नदीपात्रात 2 टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिला आहे. बागलकोट जिल्ह्यामध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.  यासाठी दि. 19 पासून हिडकल जलाशयातून घटप्रभा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्याची सूचना करण्यात आली आहे. बागलकोट जिल्ह्यासह नदीपात्र गेलेल्या इतर गावांनाही या पाण्याचा उपयोग होणार आहे. सदर भागासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 5 टीएमसी पाण्यापैकी 2 टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे या भागासाठी राखीव पाण्यापैकी 3 टीएमसी पाणी शिल्लक ठेवले आहे. श्री रामेश्वर पाणी उपसा योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी तलाव भरण्यासाठी 0.07 टीएमसी पाणी सोडण्याची सूचना केली आहे. त्यामुळे हिडकल जलाशयातून 2.07 टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश मंत्री जारकीहोळी यांनी दिला आहे.