दिवंगत जे जयललिता यांचे दागिने तामिळनाडू सरकारकडे सुपूर्द करण्याचा आदेश
बेंगळुरू येथील विशेष न्यायालयाने तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जे जयललिता यांचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने तामिळनाडू सरकारकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. जयललिता आणि इतरांविरुद्धच्या बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणातील पुराव्याचा भाग असलेल्या या सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या विल्हेवाट लावण्यासाठी तामिळनाडू सरकार आवश्यक ती कारवाई करणार आहे.
न्यायालयाने यापूर्वी म्हटले होते की, जयललिता यांच्या कुटुंबीयांना राज्याने जप्त केलेल्या संपत्तीचा अधिकार नाही. विशेष सीबीआय न्यायालयाने जयललिता यांची भाची जे दीपा आणि भाचा जे दीपक यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली होती.विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दागिने तामिळनाडू सरकारकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले, ‘दागिने लिलाव करण्याऐवजी ते तामिळनाडू राज्याच्या गृह विभागामार्फत तामिळनाडूला हस्तांतरित करणे चांगले आहे.’ असे न्यायालयाने म्हंटले आहे.
Home महत्वाची बातमी दिवंगत जे जयललिता यांचे दागिने तामिळनाडू सरकारकडे सुपूर्द करण्याचा आदेश
दिवंगत जे जयललिता यांचे दागिने तामिळनाडू सरकारकडे सुपूर्द करण्याचा आदेश
बेंगळुरू येथील विशेष न्यायालयाने तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जे जयललिता यांचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने तामिळनाडू सरकारकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. जयललिता आणि इतरांविरुद्धच्या बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणातील पुराव्याचा भाग असलेल्या या सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या विल्हेवाट लावण्यासाठी तामिळनाडू सरकार आवश्यक ती कारवाई करणार आहे. न्यायालयाने यापूर्वी म्हटले होते की, जयललिता यांच्या कुटुंबीयांना राज्याने […]
