घरपट्टी भरण्यासाठी पाच टक्के सवलतीचा आदेश
जुलै अखेरपर्यंत दिला वेळ : शहरवासियांना मोठा दिलासा
बेळगाव : शहरातील मालमत्ताधारकांना सरकारने पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला असून घरपट्टी भरणाऱ्यांना दि. 31 जुलै 2024 पर्यंत 5 टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे घरपट्टी भरणाऱ्या मालमत्ताधारकांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याने त्याचे स्वागत होत आहे. याबाबत सरकारकडून तशा आदेशाचे पत्र महानगरपालिकेला आले आहे. एप्रिल महिन्यामध्ये घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांना दरवर्षी 5 टक्के सवलत दिली जाते. यावर्षीही ही सवलत लागू होती. मात्र चलन वेळेत मिळत नव्हते. याचबरोबर ऑनलाईन समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे त्या सवलतीचा काही दिवसच लाभ मिळाला. शहरातील नागरिकांनी आणखी एक महिना सवलत वाढवून द्यावी, अशी मागणी केली. त्याबाबत महानगरपालिकेनेही बेंगळूरच्या नगरविकास खात्याकडे तो प्रस्ताव पाठविला होता. सरकारने याबाबत लवकर निर्णय घेतला नाही. त्यामुळे मे पासून विनासवलत अनेकांनी घरपट्टी भरली.
मात्र जून महिन्यात पुन्हा 5 टक्के सवलतीचा आदेश आल्याने साऱ्यांनाच दिलासा मिळाला. 31 जुलैपर्यंत 5 टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. सवलत मिळेल या आशेने अनेकांनी घरपट्टी भरली नाही. मात्र आता सरकारने आदेश दिल्यामुळे घरपट्टीमध्ये 5 टक्के कपात होणार आहे. महानगरपालिकेतर्फे पहिल्या महिन्यात घरपट्टी भरणाऱ्या करदात्यांना पाच टक्के सवलत दिली जाते. त्याचा लाभ घेण्यासाठी बरेच जण धडपडतात. यावर्षी देखील त्या सवलतीत घरपट्टी भरण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र चलन वेळेत मिळत नव्हते. याचबरोबर ऑनलाईन कर भरताना सर्व्हरडाऊनची समस्या निर्माण होत होती. त्यामुळे घरपट्टी भरण्यासाठी सकाळीच रांगेत उभे रहावे लागत होते. या समस्येमुळे या सवलतीपासून अनेकजण वंचित राहिले होते. आता पुन्हा सवलतीमध्ये वाढ केल्याने त्याचा फायदा साऱ्यांनाच होणार आहे. महानगरपालिकेलाही अधिक कर यामुळे जमा होवू शकतो. निश्चितच सरकारच्या या आदेशाचा फायदा महानगरपालिकेबरोबरच सर्वसामान्य जनतेला मिळणार आहे. ऑनलाईनद्वारे घरपट्टी भरता येते. याचबरोबर डेबीट, क्रेडीट कार्ड आणि नेट बँकिंग यांच्या माध्यमातून घरपट्टी भरता येणार असून त्यांना 5 टक्के सवलत मिळणार आहे.
त्यांना रक्कम परत मिळणार का?
सरकारने जुलै अखेरपर्यंत ही सवलत दिली आहे. गेल्या मे महिन्यामध्ये तसेच आतापर्यंत भरलेल्या करदात्यांना पाच टक्के सवलत मिळणार का? याचा उल्लेख या आदेशामध्ये देण्यात आला नाही. त्यामुळे आता त्या आदेशाकडेही साऱ्यांचे लक्ष लागून आहे. याचबरोबर महानगरपालिका आयुक्त कोणता निर्णय घेणार? हे पहावे लागणार आहे.
माजी नगरसेवक संघटनेच्या मागणीला यश
एप्रिल महिन्यामध्ये विविध समस्या निर्माण झाल्याने अनेकांना घरपट्टी भरणे अशक्य झाले होते. त्यामुळे किमान एक महिना पाच टक्के सवलतीमध्ये वाढ करावी, अशी मागणी माजी नगरसेवक संघटनेने केली होती. येथील महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांबरोबरच नगर विकास खात्याकडेही पाठपुरावा करण्यात आला होता. त्याला यश आल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
Home महत्वाची बातमी घरपट्टी भरण्यासाठी पाच टक्के सवलतीचा आदेश
घरपट्टी भरण्यासाठी पाच टक्के सवलतीचा आदेश
जुलै अखेरपर्यंत दिला वेळ : शहरवासियांना मोठा दिलासा बेळगाव : शहरातील मालमत्ताधारकांना सरकारने पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला असून घरपट्टी भरणाऱ्यांना दि. 31 जुलै 2024 पर्यंत 5 टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे घरपट्टी भरणाऱ्या मालमत्ताधारकांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याने त्याचे स्वागत होत आहे. याबाबत सरकारकडून तशा आदेशाचे पत्र महानगरपालिकेला आले आहे. […]