राज्यात मंगळवारपर्यंत ऑरेंज अलर्ट

मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा : सर्वाधिक पावसाची नोंद सांखळी व पेडणे येथे पणजी : हवामान खात्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा पुढील चार दिवसांकरिता दिला असून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. गोव्यात काल शुक्रवारी पहाटे सर्वत्र जोरदार पाऊस पडला. सोमवारी सकाळीपर्यंत गोव्यात सर्वत्र विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या 24 तासांमध्ये गोव्यातील अनेक भागाला पावसाने झोडपून काढले. सरासरी सव्वा इंच पावसाची […]

राज्यात मंगळवारपर्यंत ऑरेंज अलर्ट

मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा : सर्वाधिक पावसाची नोंद सांखळी व पेडणे येथे
पणजी : हवामान खात्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा पुढील चार दिवसांकरिता दिला असून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. गोव्यात काल शुक्रवारी पहाटे सर्वत्र जोरदार पाऊस पडला. सोमवारी सकाळीपर्यंत गोव्यात सर्वत्र विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या 24 तासांमध्ये गोव्यातील अनेक भागाला पावसाने झोडपून काढले. सरासरी सव्वा इंच पावसाची नोंद झाली. उत्तर गोव्यात सरासरी पावणेदोन इंच तर दक्षिण गोव्यात पाऊण इंच सरासरी पावसाची नोंद झाली. 1 जूनपासून पावसाच्या मौसमास मोसमास प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंत 2.5 इंच एवढी पावसाची नोंद झालेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अद्याप 37 टक्के पाऊस कमी झालेला आहे. एव्हाना किमान 4 इंच पाऊस पडून जाणे आवश्यक असते. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद सांखळी व पेडणे येथे झाली. दोन्ही ठिकाणी 2.5 इंच पावसाची नोंद झालेली आहे. म्हापसा 2 इंच, फोंडा पाऊण इंच, पणजी अर्धा इंच, जुने गोवे 1 इंच, वाळपई सव्वादोन इंच, काणकोण 1 इंच, दाबोळी, मुरगाव, केपे येथे प्रत्येकी अर्धा इंच, मडगावात पाव इंच व सांगेमध्ये पावणेदोन इंच पावसाची नोंद झाली.
ऑरेंज अलर्ट जारी
राज्यात 11 जूनपर्यंत मुसळधार पाऊस तसेच जोरदार वादळी वारे वाहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या संदर्भात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडणार आहे. जनतेने सतर्क राहावे. मच्छीमाऱ्यांनी मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे.