मराठी भाषेला मौखिक परंपरा
कोल्हापूरच्या बालशिक्षण तज्ञ सुचिता पडळकर : गुरुवर्य साठे प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा गौरव दिन
बेळगाव : मराठी भाषेला मौखिक परंपरा मोठी आहे. ती आपल्या आजी-आजोबाकडून परंपरागत सुरू आहे. पंचतंत्रांनी बालसाहित्याला प्रारंभ झाला असून लोककथा, वैज्ञानिक कथा ऐकवल्या जातात. मराठी बालसाहित्य समृद्ध करण्यासाठी साने गुरुजींनी मोठे कार्य केले आहे, असे उद्गार कोल्हापूर येथील बालशिक्षण तज्ञ सुचिता पडळकर यांनी काढले. गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मंगळवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. मराठी विद्यानिकेतन शाळेच्या आवारात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी साठे प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर होते. व्यासपीठावर अॅड. राजाभाऊ पाटील, शिवाजी अतिवाडकर, सुभाष ओऊळकर उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थिनींनी कुसुमाग्रजांची गाणी सादर केली. जयंत नार्वेकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविक इंद्रजित मोरे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांची ओळख निला आपटे यांनी करून दिली.
पडळकर पुढे म्हणाल्या, अलीकडे लहान मुलांसाठी लिहिणाऱ्या साहित्यिकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बालकांच्या हाती नवीन साहित्य मिळेनासे झाले आहे, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. लहान मुलांच्या हाती नवीन गोष्टी, साहित्य आणि कविता पडल्या पाहिजेत. ऐकणे, वाचणे या गोष्टी आकलनासाठी आहेत तर बोलणे, लिहिणे ही अभिव्यक्ती आहे. या चारही गोष्टी समृद्ध होण्यासाठी बालसाहित्य गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या हाती केवळ पाठ्यापुस्तके देऊन चालणार नाहीत तर अवांतर वाचनाची पुस्तके दिली पाहिजेत. त्याबरोबर वाचनासाठी शाळांमध्ये स्वतंत्र तास असायला हवा, असे मतदेखील त्यांनी बोलताना व्यक्त केले.चांगल्या वाचनाचे नमुने लहान मुलांना दिले पाहिजेत. नितीकथा व बोधकथा याबरोबर वास्तव्यासंबंधिताच्या गोष्टीही विद्यार्थ्यांना ऐकविल्या पाहिजेत. मुलांना सर्वगुण संपन्न करण्यासाठी वाचनाकडे वळवावे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिक्षक, रसिक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन स्नेहल पोटे यांनी केले तर आभार गौरी ओऊळकर यांनी मानले.
Home महत्वाची बातमी मराठी भाषेला मौखिक परंपरा
मराठी भाषेला मौखिक परंपरा
कोल्हापूरच्या बालशिक्षण तज्ञ सुचिता पडळकर : गुरुवर्य साठे प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा गौरव दिन बेळगाव : मराठी भाषेला मौखिक परंपरा मोठी आहे. ती आपल्या आजी-आजोबाकडून परंपरागत सुरू आहे. पंचतंत्रांनी बालसाहित्याला प्रारंभ झाला असून लोककथा, वैज्ञानिक कथा ऐकवल्या जातात. मराठी बालसाहित्य समृद्ध करण्यासाठी साने गुरुजींनी मोठे कार्य केले आहे, असे उद्गार कोल्हापूर येथील बालशिक्षण तज्ञ सुचिता पडळकर […]