‘गोल्डन ग्लोब’मध्ये ‘ओपनहायमर’ने मारली बाजी
5 पुरस्कार पटकाविले : सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले क्रिस्टोफर नोलन
वृत्तसंस्था/ लॉस एंजिलिस
2024 मधील पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला असून गोल्डन ग्लोबमध्ये ‘ओपनहायमर’चा दबदबा दिसून आला आहे. या चित्रपटाला एकूण 8 श्रेणींमध्ये नामांकनं मिळील होती. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट चित्रपटासह एकूण 5 पुरस्कार या चित्रपटाने स्वत:च्या नावावर केले आहेत.
तर टीव्ही सीरिज सक्सेशनने देखील या पुरस्कारावर स्वत:चे नाव कोरले आहे. एचबीओच्या या सीरिजने ड्रामा श्रेणीत सर्वोत्कृष्ट टीव्ही शोसमवेत एकूण 4 पुरस्कार पटकाविले आहेत. स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेता जो कोयकडून या सोहळ्याचे सूत्रसंचालन करण्यात आले. 81 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार वितरण सोहळा बेव्हर्ली हिल्टनमध्ये आयोजित झाला आहे.
पुरस्काराची श्रेणी पुरस्कार विजेते
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री लिली ग्लॅडस्टोन (किलर्स ऑफ थ्द फ्लॉवर मून)
सर्वोत्कृष्ट अभिनेता सिलियन मर्फी
सर्वोत्कृष्ट चित्रपट ओपनहायमर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन (ओपनहायमर)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री एलिझाबेथ डेबिकी (द क्राउन)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियर (ओपनहायमर)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (टीव्ही) मॅथ्यू मॅकफैडन (सक्सेशन)
सर्वोत्कृष्ट स्टँडअप कॉमेडी रिकी गेरवाइस
सर्वोत्कृष्ट चित्रपट (बिगर इंग्रजी) एनाटॉमी ऑफ द फॉल
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (टीव्ही सीरिज) अयो एडेबिर (द बियर)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मोशन पिक्चर) एम्मा स्टोन (पुअर थिंग्स)
बॉक्स ऑफिस अचिव्हमेंट अवॉर्ड बार्बी
ओरिजिनल स्कोर लुडविग गोरानसन (ओपनहायमर)
सर्वोत्कृष्ट लिमिटेड सीरिज बीफ
सर्वोत्कृष्ट टीव्ही सीरिज द बियर
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री टीव्ही सीरिज सारा स्नूक (सक्सेशन)
सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिज सक्सेशन
सर्वोत्कृष्ट अभिनेता (टीव्ही सीरिज) किरन कल्किन (सक्सेशन)
सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन पट द बॉय अँड द हेरॉन
Home महत्वाची बातमी ‘गोल्डन ग्लोब’मध्ये ‘ओपनहायमर’ने मारली बाजी
‘गोल्डन ग्लोब’मध्ये ‘ओपनहायमर’ने मारली बाजी
5 पुरस्कार पटकाविले : सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले क्रिस्टोफर नोलन वृत्तसंस्था/ लॉस एंजिलिस 2024 मधील पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला असून गोल्डन ग्लोबमध्ये ‘ओपनहायमर’चा दबदबा दिसून आला आहे. या चित्रपटाला एकूण 8 श्रेणींमध्ये नामांकनं मिळील होती. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट चित्रपटासह एकूण 5 पुरस्कार या चित्रपटाने स्वत:च्या नावावर केले आहेत. तर टीव्ही सीरिज सक्सेशनने […]