लोककल्प फौंडेशनतर्फे नेत्रचिकित्सा शिबिर

बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे नंदादीप आय केअर हॉस्पिटलच्या पुढाकाराने खानापूर तालुक्यातील कणकुंबी गावात मोफत नेत्रचिकित्सा शिबिर घेण्यात आले. यावेळी 95 हून अधिक ग्रामस्थांची नेत्रचिकित्सा करण्यात आली. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांच्या पुढाकाराने खानापूर तालुक्यातील 32 गावांमध्ये आरोग्य व शिक्षण सुविधा पुरविण्यात येत आहेत. कणकुंबी हे याच उपक्रमातील एक गाव आहे. याप्रसंगी लोककल्पचे […]

लोककल्प फौंडेशनतर्फे नेत्रचिकित्सा शिबिर

बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे नंदादीप आय केअर हॉस्पिटलच्या पुढाकाराने खानापूर तालुक्यातील कणकुंबी गावात मोफत नेत्रचिकित्सा शिबिर घेण्यात आले. यावेळी 95 हून अधिक ग्रामस्थांची नेत्रचिकित्सा करण्यात आली. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांच्या पुढाकाराने खानापूर तालुक्यातील 32 गावांमध्ये आरोग्य व शिक्षण सुविधा पुरविण्यात येत आहेत. कणकुंबी हे याच उपक्रमातील एक गाव आहे. याप्रसंगी लोककल्पचे प्रसाद असुकर, स्वयंसेवक संतोष कदम व सुहासिनी पेडणेकर उपस्थित होते.