अवघे वातावरण श्रीराममय!
गोव्यातील राममंदिरांमध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
पणजी : राज्यात आज सर्वत्र श्रीरामनवमी उत्सव भक्तिभावाने व उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्त सर्व ठिकाणची श्रीराम व श्रीहनुमान मंदिरे सज्ज झाली आहेत. संपूर्ण देशभराप्रमाणे यंदापासून प्रथमच गोवा सरकारनेही गोव्यात रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. गोव्यात आज सर्वत्र रामनवमी जोरदारपणे साजरी केली जाणार आहे. यानिमित्त गोव्यातील विविध मंदिरांमध्ये आज सकाळपासून धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होईल. गोव्यातील विविध मंदिरांमध्ये आज पुराण वाचन आणि कीर्तन सादर करण्यात येईल. त्यानंतर दुपारी 12.30 वा. श्रीराम जन्मोत्सव होईल. ‘कुलभूषणा दशरथानंदना बाळा जो जो रे!’ हा पारंपरिक पाळणा सादर कऊन रामाचा जन्मोत्सव होईल. त्यानंतर रामपूजा व महाआरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद व सायंकाळी पालखी, भजन व नाट्याप्रयोग सादर करण्यात येणार आहेत. पिळगाव, कोलवाळ, भाटले, रायबंदर, करमळी, कुंभारजुवे, होंडा, फोंडा, खोतोडे, बोरी, वास्को, मडगाव अशा अनेक गावांमध्ये श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात व थाटात साजरा केला जाणार आहे.
Home महत्वाची बातमी अवघे वातावरण श्रीराममय!
अवघे वातावरण श्रीराममय!
गोव्यातील राममंदिरांमध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन पणजी : राज्यात आज सर्वत्र श्रीरामनवमी उत्सव भक्तिभावाने व उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्त सर्व ठिकाणची श्रीराम व श्रीहनुमान मंदिरे सज्ज झाली आहेत. संपूर्ण देशभराप्रमाणे यंदापासून प्रथमच गोवा सरकारनेही गोव्यात रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. गोव्यात आज सर्वत्र रामनवमी जोरदारपणे साजरी केली जाणार आहे. यानिमित्त गोव्यातील विविध मंदिरांमध्ये […]