Miraj Crime : मिरजेत लग्नासाठी नकार दिल्याने एकावर खुरप्याने वार

                     टाकळी गावात विवाह वादातून हिंसाचाराची घटना मिरज : टाकळी येथे लग्नासाठी नकार दिल्यातून एकावर खुरप्याने वार करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. तर बापाला वाचविण्यासाठी आलेल्या मुलीचा बोट देखील हल्ल्यात तुटले. दोघाही जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, […]

Miraj Crime : मिरजेत लग्नासाठी नकार दिल्याने एकावर खुरप्याने वार

                     टाकळी गावात विवाह वादातून हिंसाचाराची घटना
मिरज : टाकळी येथे लग्नासाठी नकार दिल्यातून एकावर खुरप्याने वार करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. तर बापाला वाचविण्यासाठी आलेल्या मुलीचा बोट देखील हल्ल्यात तुटले. दोघाही जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, टाकळी येथील अभय सुभाष पाटील याने अभयकुमार रायगोंडा पाटील रा. टाकळी यांच्याकडे त्यांच्या मुलीसाठी लग्रासाठी विचारणा केली पण, अभयकुमार पाटील यांनी मुलगी देण्यास नकार दिला. या गोष्टीसाठी नातेवाईक तसेच शेजारील नागरिकांनी अक्षय पाटीलची समजूत काढली होती. दरम्यान अभयकुमार पाटील यांच्या मुलीचा साखरपुडा आज रविवारी सायंकाळी होता.
सदरचा रागमनात धरून एका बॅगेत खुरपे लपवून अक्षय पाटील हा अभयकुमार पाटील यांच्या घराजवळ आला. त्याने रागातून अभयकुमार पाटील यांच्या डोक्यात हल्ला चढवला, हा हल्ला रोखण्यासाठी त्यांची मुलगी आली असता हल्ल्यात मुलगीचा बोट पूर्णपणे तुटला हा हल्ला करून अक्षय पाटीलने तिथून पलायन केले. दरम्यान गंभीर जखमी अभयकुमार पाटील व त्यांच्या मुलीस रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक अजित सिव यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल झाले. याबाबत अन्नय पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रविवारी सुरू होते.