नागपुरात मानकापूर येथे गोळीबारात एकाची हत्या, एक जखमी, तिघांना अटक
नागपुरातील मानकापूर परिसरात जुन्या वैमनस्यातून आरोपींनी दोघांवर गर्दीच्या ठिकाणी बाजारपेठेत चार राउंड गोळीबार केल्याने एकाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. सोहेल खान असे मयतचे नाव आहे. तो मिरचीचा व्यापार करायचा.या हल्ल्यात मोहम्मद सुलतान मोहम्मद शफी गंभीर जखमी झाला आहे.पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली आहे.
ALSO READ: नांदेडमध्ये भीषण अपघात, ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने सहा कामगार बुडाल्याची भीती
मिळालेल्या माहितीनुसार, मयत सोहेल आणि आरोपींमध्ये जुने वैमनस्य होते. शत्रुत्वामुळे आरोपींनी हत्येचा कट रचला गुरुवारी रात्री आरोपी मानकापूर पोलीस ठाण्यांतर्गत गोधनी बाजारपेठेत गेले आणि त्यांनी ताबड्तोब गोळीबार सुरु केला. गोळी लागून सोहेलचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
ALSO READ: नागपुरात ३५ वर्षीय व्यक्तीची दिवसाढवळ्या हत्या, तिघांना अटक
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. या हल्ल्यात मोहम्मद सुलतान मोहम्मद शफी गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या हल्ल्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी पोलीस सतर्क झाले आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.
Edited By – Priya Dixit
ALSO READ: महाराष्ट्रात वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट