धारगळ येथे कारची धडक बसून एकाचा जागीच मृत्यू

पेडणे : धारगळ पंचायती समोर राष्ट्रीय महामार्गावर स्विफ्ट गाडीची धडक बसून  अपघातात एक पदचारी जागीच ठार झाला. मिळालेल्या माहितीनुसार तीवाडा धारगळ येथील चंद्रकांत कांबळी वय वर्षे (50)  हा पंचायत समोरील राष्ट्रीय महामार्ग वरून रस्ता ओलांडत जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या ट?क्सी स्फीट गाडी क्रमांक  जीए. 07   टी 0907 या टॅक्सी गाडीची  जोरदार धडक बसल्याने या […]

धारगळ येथे कारची धडक बसून एकाचा जागीच मृत्यू

पेडणे : धारगळ पंचायती समोर राष्ट्रीय महामार्गावर स्विफ्ट गाडीची धडक बसून  अपघातात एक पदचारी जागीच ठार झाला. मिळालेल्या माहितीनुसार तीवाडा धारगळ येथील चंद्रकांत कांबळी वय वर्षे (50)  हा पंचायत समोरील राष्ट्रीय महामार्ग वरून रस्ता ओलांडत जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या ट?क्सी स्फीट गाडी क्रमांक  जीए. 07   टी 0907 या टॅक्सी गाडीची  जोरदार धडक बसल्याने या अपघातात चंद्रकांत कांबळी याचा जागीच मृत्यू झाला. धारगळ पंचायत समोर हा अपघात झाल्याने माजी सरपंच तथा विद्यमान पंच भूषण नाईक आणि  या परिसरातील लोक जमा झाले. चंद्रकांत कांबळी याला पत्नी , एक मुलगा आणि एक मुलगी आहे.  पेडणे पोलिसांना  अपघाताची माहिती मिळाल्यानंतर  पेडणे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला पुढील तपास सुरू आहे.

Go to Source