मालाड : भरधाव रिक्षाच्या धडकेत 42 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू
मालाड पश्चिम (Malad West) येथे बुधवारी रात्री भरधाव रिक्षाने धडक दिल्याने 42 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला. मालाड पश्चिम येथील मिठ चौक (Mith Chowk) जंक्शन येथे रात्री 9च्या सुमारास हा अपघात झाला. पादचाऱ्याचे नाव वसीम अन्सारी असून तो आपल्या नातेवाईकांना भेटून घरी जात आहे. मालवणी (Malvani) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिक्षाची धडक इतकी जोरदार होती की, वसीम अन्सारी काही फूट अंतरावर फेकले गेले. फूटपाथवर त्यांचे डोके आपटले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अन्सारी यांचा मोठा भाऊ तनवीर म्हणाला की, “आम्हाला मालवणी पोलिसांनी (Police) फोन करून अपघाताबद्दल कळवले. माहिती मिळताच आम्ही तातडीने शताब्दी हॉस्पीटलला (Shatabdi Hospital) धाव घेतली. हॉस्पीटलला पाेहाेचताच आम्हाला रिक्षाच्या मागच्या सीटवर रक्त दिसले आणि त्याचा फोटो काढला. त्यानंतर आम्ही डॉक्टरकडे रिक्षाबाबत विचारपूस केली असता ते म्हणाले रिक्षाचालकाने त्यांना हॉस्पीटलला आणून सोडले आणि तो पळून गेला. त्यानंतर भावाची चौकशी केली असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.”डॉक्टरांनी अन्सारी यांना मृत घोषित केल्यानंतर, तन्वीरने पोलिसांशी संपर्क साधला आणि त्याच्या तक्रारीवरून अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध कलम 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि 279 (रॅश ड्रायव्हिंग) आणि कलम 184 (गती मोटार कायदा) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालवणी पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही रिक्षा ताब्यात घेतली असून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत.हेही वाचा नवी मुंबई : थकबाकी न दिल्याने कामगाराकडून मालकाची हत्यावसईत भर रस्त्यात तरूणाकडून प्रेयसीची हत्या
Home महत्वाची बातमी मालाड : भरधाव रिक्षाच्या धडकेत 42 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू
मालाड : भरधाव रिक्षाच्या धडकेत 42 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू
मालाड पश्चिम (Malad West) येथे बुधवारी रात्री भरधाव रिक्षाने धडक दिल्याने 42 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला. मालाड पश्चिम येथील मिठ चौक (Mith Chowk) जंक्शन येथे रात्री 9च्या सुमारास हा अपघात झाला. पादचाऱ्याचे नाव वसीम अन्सारी असून तो आपल्या नातेवाईकांना भेटून घरी जात आहे.
मालवणी (Malvani) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिक्षाची धडक इतकी जोरदार होती की, वसीम अन्सारी काही फूट अंतरावर फेकले गेले. फूटपाथवर त्यांचे डोके आपटले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अन्सारी यांचा मोठा भाऊ तनवीर म्हणाला की, “आम्हाला मालवणी पोलिसांनी (Police) फोन करून अपघाताबद्दल कळवले. माहिती मिळताच आम्ही तातडीने शताब्दी हॉस्पीटलला (Shatabdi Hospital) धाव घेतली. हॉस्पीटलला पाेहाेचताच आम्हाला रिक्षाच्या मागच्या सीटवर रक्त दिसले आणि त्याचा फोटो काढला. त्यानंतर आम्ही डॉक्टरकडे रिक्षाबाबत विचारपूस केली असता ते म्हणाले रिक्षाचालकाने त्यांना हॉस्पीटलला आणून सोडले आणि तो पळून गेला. त्यानंतर भावाची चौकशी केली असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.”
डॉक्टरांनी अन्सारी यांना मृत घोषित केल्यानंतर, तन्वीरने पोलिसांशी संपर्क साधला आणि त्याच्या तक्रारीवरून अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध कलम 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि 279 (रॅश ड्रायव्हिंग) आणि कलम 184 (गती मोटार कायदा) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालवणी पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही रिक्षा ताब्यात घेतली असून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत.हेही वाचा
नवी मुंबई : थकबाकी न दिल्याने कामगाराकडून मालकाची हत्या
वसईत भर रस्त्यात तरूणाकडून प्रेयसीची हत्या