ताळगाव पंचायतीचा एक उमेदवार बिनविरोध

प्रभाग तीनमध्ये तिहेरी तर अन्य प्रभागात दुहेरी लढत पणजी : ताळगाव ग्राम पंचायतीसाठी येत्या दि. 28 रोजी होणाऱ्या निवडणुकीतील एक उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे. उर्वरित प्रभागांपैकी प्रभाग 3 मध्ये तिहेरी तर अन्य प्रभागात दुहेरी लढत होणार आहे. एकूण 11 प्रभागांच्या या पंचायतीत बाबूश मोन्सेरात पॅनलद्वारे सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उतरविण्यात आले आहेत. त्यापैकी प्रभाग 10 […]

ताळगाव पंचायतीचा एक उमेदवार बिनविरोध

प्रभाग तीनमध्ये तिहेरी तर अन्य प्रभागात दुहेरी लढत
पणजी : ताळगाव ग्राम पंचायतीसाठी येत्या दि. 28 रोजी होणाऱ्या निवडणुकीतील एक उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे. उर्वरित प्रभागांपैकी प्रभाग 3 मध्ये तिहेरी तर अन्य प्रभागात दुहेरी लढत होणार आहे. एकूण 11 प्रभागांच्या या पंचायतीत बाबूश मोन्सेरात पॅनलद्वारे सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उतरविण्यात आले आहेत. त्यापैकी प्रभाग 10 मधील उमेदवार सागर बांदेकर हा बिनविरोध विजयी झाला आहे. उर्वरित उमेदवारांमध्ये प्रभाग-1 (ओबीसी) सिद्धी केरकर व मयुर उस्कईकर, प्रभाग-2 (सर्वसाधारण) आग्नेल डिकुन्हा व दुमिंग डिकुन्हा, प्रभाग-3 (महिला) हेलेना परेरा, ईमी रॉड्रिगीश व प्रतिमा शिरोडकर, प्रभाग-4 (महिला) रितिका गावस व माधवी काणकोणकर, प्रभाग-5 (एसटी) दीशा मुरगांवकर व उशांत काणकोणकर, प्रभाग-6 (महिला) इस्टेला डिसोझा व प्रतिमा शिरोडकर,  प्रभाग-7 (सर्वसाधारण) जानू रोझारिओ व विजू दिवकर, प्रभाग-8 (सर्वसाधारण) ईमान डायस व मारिया फर्नांडीस, प्रभाग-9 (महिला) संजना दिवकर व वनिता वेळुसकर, प्रभाग-11 (सर्वसाधारण) कँडिडो डायस व सिडनी बार्रेटो यांचा समावेश आहे. ताळगाव पंचायतीच्या विद्यमान मंडळाची मुदत 8 मे रोजी संपत असून त्यासाठी नव्याने निवडणूक घेण्यासाठी 4 एप्रिलपासून निवडणूक प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. दि. 28 रोजी मतदान होणार आहे.