वरळीतील स्पामधील हत्येला नवा ट्विस्ट
मुंबईतील वरळी (worli) भागात एका स्पामध्ये केलेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने नालासोपारामधून (Nalasopara) एकाला आणि राजस्थानच्या कोटा मधून दोन आरोपींना अटक केली आहे. वरळी (Worli) पोलिसांनीही स्पाच्या मालकाला अटक केलेली आहे. परवा रात्री वरळीच्या स्पा मध्ये रात्री एक वाजता वाघमारेची चाकूने हत्या केल्याचं समोर आलं होतं. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) आणखी काही लोकांची यामध्ये चौकशी सुरू आहे.खंडणीच्या त्रासाला कंटाळून दोन स्पा मालकांकडून सहा लाखांची सुपारी देऊन गुरुसिद्धप्पा वाघमारेची हत्या केल्याचं समोर आले आहे. मात्र या हत्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. हत्या झालेल्या गुरू वाघमारेच्या दोन्ही मांड्यावर तब्बल 22 नाव गोंदवली आहेत. माझ्या जीवितास काही बरेवाईट झाल्यास हे लोक जबाबदार असतील असं म्हणून चक्क ही नावे गोंदवली आहेत. पोलिसांकडून या 22 लोकांची चौकशी होणार आहे.
गुरु वाघमारे (52) यांची बुधवारी पहाटे दोन अज्ञात व्यक्तींनी स्पामध्ये हत्या केली. वाघमारे पोलिसांचा खबरी आणि माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण त्याच्यावर बलात्कार आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. ही ‘सुपारी’ देऊन केलेली हत्या होती, असे पोलीस (police) अधिकाऱ्याने सांगितले. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्रकरणाच्या तपशीलानुसार, मुंबईतील विलेपार्ले येथे राहणारा वाघमारे वरळी नाका येथे असलेल्या स्पामध्ये नियमितपणे जात असे. त्यामुळे तेथे काम करणारे लोक त्याला ओळखत होते. त्यांच्यासोबतच वाघमारे पार्टीसाठी बाहेर गेले. पार्टीनंतर ते सगळे पुन्हा स्पामध्ये आले. त्यापैकी तिघे जण घरी गेले. पण वाघमारे आणि त्यांची मैत्रिण तिथेच थांबले. तितक्यात स्पामध्ये दोन व्यक्तींनी प्रवेश केला आणि त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. पहाटे अडीचच्या सुमारास या घटनेची माहिती वरळी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता वाघमारे हा गळा चिरलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात सापडला. वाघमारेवर मुलुंड पोलिस ठाण्यात बलात्काराच्या गुन्ह्यासह त्याच्यावर किमान 10 गुन्हे दाखल आहेत, असे पोलिसांनी सांगितले.हेही वाचाबोरिवली रेल्वे स्थानकावर तिकीट तपासकांविरुद्ध गुन्हा दाखलMumbai Rain : मुंबईत शुक्रवारपर्यंत रेड अलर्ट जारी
Home महत्वाची बातमी वरळीतील स्पामधील हत्येला नवा ट्विस्ट
वरळीतील स्पामधील हत्येला नवा ट्विस्ट
मुंबईतील वरळी (worli) भागात एका स्पामध्ये केलेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने नालासोपारामधून (Nalasopara) एकाला आणि राजस्थानच्या कोटा मधून दोन आरोपींना अटक केली आहे. वरळी (Worli) पोलिसांनीही स्पाच्या मालकाला अटक केलेली आहे. परवा रात्री वरळीच्या स्पा मध्ये रात्री एक वाजता वाघमारेची चाकूने हत्या केल्याचं समोर आलं होतं. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) आणखी काही लोकांची यामध्ये चौकशी सुरू आहे.
खंडणीच्या त्रासाला कंटाळून दोन स्पा मालकांकडून सहा लाखांची सुपारी देऊन गुरुसिद्धप्पा वाघमारेची हत्या केल्याचं समोर आले आहे. मात्र या हत्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. हत्या झालेल्या गुरू वाघमारेच्या दोन्ही मांड्यावर तब्बल 22 नाव गोंदवली आहेत. माझ्या जीवितास काही बरेवाईट झाल्यास हे लोक जबाबदार असतील असं म्हणून चक्क ही नावे गोंदवली आहेत. पोलिसांकडून या 22 लोकांची चौकशी होणार आहे. गुरु वाघमारे (52) यांची बुधवारी पहाटे दोन अज्ञात व्यक्तींनी स्पामध्ये हत्या केली. वाघमारे पोलिसांचा खबरी आणि माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण त्याच्यावर बलात्कार आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
ही ‘सुपारी’ देऊन केलेली हत्या होती, असे पोलीस (police) अधिकाऱ्याने सांगितले. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
प्रकरणाच्या तपशीलानुसार, मुंबईतील विलेपार्ले येथे राहणारा वाघमारे वरळी नाका येथे असलेल्या स्पामध्ये नियमितपणे जात असे. त्यामुळे तेथे काम करणारे लोक त्याला ओळखत होते. त्यांच्यासोबतच वाघमारे पार्टीसाठी बाहेर गेले. पार्टीनंतर ते सगळे पुन्हा स्पामध्ये आले. त्यापैकी तिघे जण घरी गेले. पण वाघमारे आणि त्यांची मैत्रिण तिथेच थांबले. तितक्यात स्पामध्ये दोन व्यक्तींनी प्रवेश केला आणि त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले.
पहाटे अडीचच्या सुमारास या घटनेची माहिती वरळी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता वाघमारे हा गळा चिरलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात सापडला. वाघमारेवर मुलुंड पोलिस ठाण्यात बलात्काराच्या गुन्ह्यासह त्याच्यावर किमान 10 गुन्हे दाखल आहेत, असे पोलिसांनी सांगितले.हेही वाचा
बोरिवली रेल्वे स्थानकावर तिकीट तपासकांविरुद्ध गुन्हा दाखल
Mumbai Rain : मुंबईत शुक्रवारपर्यंत रेड अलर्ट जारी