मार्केट यार्डमध्ये भरदिवसा व्यापाऱ्याचे दीड लाख लंपास
दुचाकीची डिक्की फोडली : लोंढ्याच्या व्यापाऱ्याला धक्का
बेळगाव : दुचाकीच्या डिक्कीतून भरदिवसा दीड लाख रुपये पळविण्यात आले आहेत. मार्केट यार्डमधील एका अडत दुकानासमोर ही घटना घडली असून भामट्याची करामत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मारुती गल्ली, लोंढा येथील राजू व्हिक्टर डिकॉस्टा या कांदा-बटाटा व्यापाऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून पैसे पळविण्यात आले आहेत. राजू बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास केए 22 ईआर 3434 क्रमांकाच्या होंडा अॅक्टिव्हावरून खरेदीसाठी बेळगावला आले होते. मार्केट यार्डमधील राजदीप ट्रेडर्सजवळ सकाळी 10 वाजता त्यांनी आपली दुचाकी उभी केली. अडत दुकानात जाऊन काही मिनिटात ते आपल्या दुचाकीजवळ परतले. तोपर्यंत एका भामट्याने त्यांच्या डिक्कीतील 1 लाख 45 हजार रुपये पळविल्याचे उघडकीस आले. सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली.
केवळ पंधरा मिनिटात भामट्याने आपली हातचलाखी दाखवली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून संशयिताचा सुगावा लागला आहे. फुटेजवरून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. घटनेची माहिती समजताच मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. उपलब्ध माहितीनुसार पोलिसांनी एका संशयिताची चौकशी सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यात दुचाकीच्या डिक्कीतून पैसे पळविल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. बुधवारी सकाळी घडलेल्या घटनेने मार्केट यार्ड परिसरात खळबळ माजली आहे. एपीएमसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
भामटा आधीच हजर
राजू डिकॉस्टा यांनी आपली दुचाकी उभी करण्याआधीच भामटा या परिसरात दुचाकीवरून दाखल झाला होता. राजू यांनी आपली होंडा अॅक्टिव्हा उभी करून अडत दुकानात प्रवेश केल्यानंतर लगेच भामट्याने त्यांच्या दुचाकीची डिक्की उघडून पैसे पळविल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पैसे घेतल्यानंतर त्वरित तो तेथून प्रसार होतो.
Home महत्वाची बातमी मार्केट यार्डमध्ये भरदिवसा व्यापाऱ्याचे दीड लाख लंपास
मार्केट यार्डमध्ये भरदिवसा व्यापाऱ्याचे दीड लाख लंपास
दुचाकीची डिक्की फोडली : लोंढ्याच्या व्यापाऱ्याला धक्का बेळगाव : दुचाकीच्या डिक्कीतून भरदिवसा दीड लाख रुपये पळविण्यात आले आहेत. मार्केट यार्डमधील एका अडत दुकानासमोर ही घटना घडली असून भामट्याची करामत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मारुती गल्ली, लोंढा येथील राजू व्हिक्टर डिकॉस्टा या कांदा-बटाटा व्यापाऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून पैसे […]