सांबरा विमानतळावर दीड लाखाची रोकड जप्त

बेळगाव : सांबरा विमानतळावर एका प्रवाशाकडून दीड लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक विभागाच्या एफएसटी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुसार 50 हजारांपेक्षा अधिक रोकड घेऊन जाण्यास निर्बंध आहेत. 50 हजारांहून अधिक रक्कम असल्यास त्यासंदर्भातील कागदपत्रे आवश्यक आहेत. सांबरा विमानतळावर आलेल्या जसवीरसिंग या प्रवाशाकडे 1.50 […]

सांबरा विमानतळावर दीड लाखाची रोकड जप्त

बेळगाव : सांबरा विमानतळावर एका प्रवाशाकडून दीड लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक विभागाच्या एफएसटी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुसार 50 हजारांपेक्षा अधिक रोकड घेऊन जाण्यास निर्बंध आहेत. 50 हजारांहून अधिक रक्कम असल्यास त्यासंदर्भातील कागदपत्रे आवश्यक आहेत. सांबरा विमानतळावर आलेल्या जसवीरसिंग या प्रवाशाकडे 1.50 लाख रोख रक्कम आढळून आली. तहसीलदारांनी दिलेल्या माहितीवरून मारिहाळ येथील एफएसटी पथकाचे अधिकारी शशिकांत कोळेकर यांनी सांबरा विमानतळावर प्रवाशाची तपासणी करून त्याच्याकडील दीड लाखाची रोकड जप्त केली आहे. याबाबत निवडणूक विभागाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.