गुंजीत श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनानिमित्त शोभायात्रा अयोध्याप्रमाणेच सर्व मुहूर्त साधून केली पूजा
गुंजी : अयोध्येत ज्याप्रमाणे रामलल्लाची मुहूर्त साधून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ते सर्व मुहूर्त साधून गुंजी येथील माउली मंदिरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम प्रतिमेचे श्रद्धापूर्वक पूजन करण्यात आले. सकाळी श्री हनुमान मंदिरापासून श्रीरामाच्या प्रतिमेची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर सर्वत्र सडा, रांगोळ्dया, श्री रामाच्या प्रतिमा, भगवे ध्वज, भगव्या पताका, सजीव देखावे, कमानी, तोरणे बांधून सुशोभित करण्यात आले होते. ढोलताशे व टाळ मृदंगाच्या तालावर वारकरी, ग्रामस्थ आणि सुवासिनी श्री रामाचा जयघोष करत मिरवणुकीमध्ये सामील होते. त्यामुळे गावात अयोध्या नगरीच अवतरल्याचा आभास होत असल्याचे बोलले जात होते. माउली मंदिरात श्रीराम प्रतिमेचे पुरोहितामार्फत मुहूर्तावर विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी महाआरती, रामरक्षा, हनुमान चालीसा व राम नामाचा सामूहिक जप करण्यात आला. व त्यानंतर प्रतिमेसमोरील कलशावर अक्षतारोपण करण्यात आले. यावेळी या ठिकाणी थेट अयोध्येहून राम मंदिरात प्रक्षेपित होत असलेला कार्यक्रम भक्तांना पाहण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती. भजन, कीर्तन, नामस्मरण यानंतर सर्व भाविकांना येथील सोशियल फाऊंडेशनच्या सहकार्यातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळीही घराघरासमोर दिव्यांची आरास करण्यात आली होती. त्यामुळे गावात पुन्हा दिवाळीची अनुभूती पहावयास मिळाली. गुंजीबरोबरच भालके के. एच., भालके बी. के, संगरगाळी, किरावळा, आंबेवाडी, कामतगा या गावातही श्रीरामाची पूजा व महाप्रसादाचे आयोजन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
Home महत्वाची बातमी गुंजीत श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनानिमित्त शोभायात्रा अयोध्याप्रमाणेच सर्व मुहूर्त साधून केली पूजा
गुंजीत श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनानिमित्त शोभायात्रा अयोध्याप्रमाणेच सर्व मुहूर्त साधून केली पूजा
गुंजी : अयोध्येत ज्याप्रमाणे रामलल्लाची मुहूर्त साधून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ते सर्व मुहूर्त साधून गुंजी येथील माउली मंदिरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम प्रतिमेचे श्रद्धापूर्वक पूजन करण्यात आले. सकाळी श्री हनुमान मंदिरापासून श्रीरामाच्या प्रतिमेची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर सर्वत्र सडा, रांगोळ्dया, श्री रामाच्या प्रतिमा, भगवे ध्वज, भगव्या पताका, सजीव देखावे, कमानी, तोरणे बांधून […]
