15 जानेवारी महानगरपालिका निवडणुकाच्या दिवशी राज्यातील कर्मचाऱ्यांना ‘पगारी सुट्टी

राज्यात 15 जानेवरी महानगरपालिका निवडणुकाच्या दिवशी राज्य सरकारने सर्व सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापनातील कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या निवडणुकांमध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग असावा, …

15 जानेवारी महानगरपालिका निवडणुकाच्या दिवशी राज्यातील कर्मचाऱ्यांना ‘पगारी सुट्टी

राज्यात 15 जानेवरी महानगरपालिका निवडणुकाच्या दिवशी राज्य सरकारने  सर्व सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापनातील कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या निवडणुकांमध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग असावा, या उद्देशाने राज्य सरकारने मोठे  पाऊल उचलले आहे.

ALSO READ: मनसे-शिवसेना यूबीटीचा जाहीरनामा प्रसिद्ध
आगामी 15 जानेवारी 2026 रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. या दिवशी सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य सरकारने अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे.

 

ही सवलत मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई सह राज्यातील सर्व 29 महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांना  मिळणार आहे. ज्या ठिकाणी पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नाही अशा ठिकाणी किमान 2 ते 3 तासांची सवलत देणे बंधनकारक असेल.

ALSO READ: महायुतीचे ६८ उमेदवार नगरसेवक झाले, पण कसे?

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, जर एखादी खासगी कंपनी किंवा आस्थापना आपल्या कर्मचाऱ्याला मतदानासाठी सुट्टी देण्यास नकार दिल्यावर मालकाच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. 

ALSO READ: बीएमसी निवडणुकीत 32 जागांसाठी थेट लढत निश्चित

ही सुट्टी सर्व सरकारी कार्यालये, निमसरकारी संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने, बँका आणि खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना लागू असेल.लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या कलम 135 (ब) नुसार, मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांचा पगार कापता येणार नाही.

Edited By – Priya Dixit

 

Go to Source