महापालिका कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करणार
मुंबई (mumbai) महापालिका (brihanmumbai muncipal corporation) प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या पेंशनबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना (employees) याचा मोठा फायदा होणार आहे. 5 मे 2008 पूर्वी भरती झालेल्या 2700 कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश करण्यास पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी मान्यता दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.2008 च्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, यासाठी ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’चे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. शिवसेना-उबाठा पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी पुढाकार घेऊन आयुक्तांना विनंती केल्यामुळे मंगळवारी निर्णायक बैठक झाल्याची माहिती कामगार सेनेचे उपाध्यक्ष संजय कांबळे बापेरकर यांनी दिली.केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2004 पासून ‘जुनी पेंशन’ योजना बंद करून नवीन अंशदायी पेंशन योजना चालू केली होती. त्यानंतर राज्य शासनाने व नंतर मुंबई महापालिकेने (bmc) अनुक्रमे 1 नोव्हेंबर 2005 व 5 मे 2008 पासून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची जुनी पेंशन योजना (old pension scheme) बंद करण्याचा निर्णय घेतला होता.हेही वाचाझोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी ‘क्लस्टर’ योजना राबविणारनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वतंत्र पोलिस चौकी
Home महत्वाची बातमी महापालिका कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करणार
महापालिका कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करणार
मुंबई (mumbai) महापालिका (brihanmumbai muncipal corporation) प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या पेंशनबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना (employees) याचा मोठा फायदा होणार आहे.
5 मे 2008 पूर्वी भरती झालेल्या 2700 कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश करण्यास पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी मान्यता दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
2008 च्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, यासाठी ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’चे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते.
शिवसेना-उबाठा पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी पुढाकार घेऊन आयुक्तांना विनंती केल्यामुळे मंगळवारी निर्णायक बैठक झाल्याची माहिती कामगार सेनेचे उपाध्यक्ष संजय कांबळे बापेरकर यांनी दिली.
केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2004 पासून ‘जुनी पेंशन’ योजना बंद करून नवीन अंशदायी पेंशन योजना चालू केली होती.
त्यानंतर राज्य शासनाने व नंतर मुंबई महापालिकेने (bmc) अनुक्रमे 1 नोव्हेंबर 2005 व 5 मे 2008 पासून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची जुनी पेंशन योजना (old pension scheme) बंद करण्याचा निर्णय घेतला होता.हेही वाचा
झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी ‘क्लस्टर’ योजना राबविणार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वतंत्र पोलिस चौकी