ओला इलेक्ट्रीकचा आयपीओ येणार ऑगस्टमध्ये

नवी दिल्ली : इलेक्ट्रीक दुचाकी क्षेत्रातील कंपनी ओला इलेक्ट्रीक यांचा आयपीओ ऑगस्ट महिन्यामध्ये सादर केला जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 4.5 अब्ज डॉलरची रक्कम उभारणार आहे. कंपनीचे सर्वेसर्वा भाविश अग्रवाल यांनी वरील माहिती दिली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये कंपनी आपला आयपीओ सादर करू शकते. इलेक्ट्रीक दुचाकी क्षेत्रामध्ये पाहता ओला इलेक्ट्रीक […]

ओला इलेक्ट्रीकचा आयपीओ येणार ऑगस्टमध्ये

नवी दिल्ली :
इलेक्ट्रीक दुचाकी क्षेत्रातील कंपनी ओला इलेक्ट्रीक यांचा आयपीओ ऑगस्ट महिन्यामध्ये सादर केला जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 4.5 अब्ज डॉलरची रक्कम उभारणार आहे.
कंपनीचे सर्वेसर्वा भाविश अग्रवाल यांनी वरील माहिती दिली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये कंपनी आपला आयपीओ सादर करू शकते. इलेक्ट्रीक दुचाकी क्षेत्रामध्ये पाहता ओला इलेक्ट्रीक ही आयपीओ सादर करणारी पहिली वहिली कंपनी असणार आहे. कंपनीने आयपीओ सादरीकरणासाठी 22 डिसेंबर 2023 ला बाजारातील नियामक सेबीकडे आपला अर्ज सादर केला होता. कंपनीने कोटक महिंद्रा कॅपिटल आणि गोल्डमॅन सॅच यांना सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे.