यात्रा पुरवणीचे थाटात प्रकाशन

वार्ताहर /किणये बिजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप (मोरे बंधू) या तिन्ही गावांची महालक्ष्मी देवीची यात्रा मंगळवार दि. 16 पासून उत्साहात सुरू झाली. या यात्रेनिमित्त दै. तरुण भारतमधून महालक्ष्मी यात्रोत्सव विशेषांक मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. या पुरवणीचे बिजगर्णी गावात मोठ्या थाटात प्रकाशन करण्यात आले. तब्बल 30 वर्षांनंतर महालक्ष्मी देवी यात्रा भरविली आहे. दै. तरुण भारतच्या महालक्ष्मी यात्रोत्सव […]

यात्रा पुरवणीचे थाटात प्रकाशन

वार्ताहर /किणये
बिजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप (मोरे बंधू) या तिन्ही गावांची महालक्ष्मी देवीची यात्रा मंगळवार दि. 16 पासून उत्साहात सुरू झाली. या यात्रेनिमित्त दै. भारत लाईव्ह न्यूज मीडियामधून महालक्ष्मी यात्रोत्सव विशेषांक मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. या पुरवणीचे बिजगर्णी गावात मोठ्या थाटात प्रकाशन करण्यात आले. तब्बल 30 वर्षांनंतर महालक्ष्मी देवी यात्रा भरविली आहे. दै. भारत लाईव्ह न्यूज मीडियाच्या महालक्ष्मी यात्रोत्सव विशेषांकमध्ये बिजगर्णीतील जागृत महालक्ष्मीदेवी यात्रोत्सवाची सविस्तर माहिती दिली आहे. महालक्ष्मीदेवी मंदिराचा इतिहास प्रसिद्ध केला आहे. बिजगर्णीतील जागृत ब्रम्हलिंग देवाचा महिमा पुरवणीतून मांडला आहे. पुरातन ब्रम्हलिंग मंदिराची सविस्तर माहिती वाचकांना उपलब्ध केली आहे. बिजगर्णीतील हनुमान मंदिर, कलमेश्वर मंदिर, म्हारताळ देवस्थान, भावकाई यांची माहिती दिली आहे.
यात्रेतील रथाची विशेष माहिती, सुवर्ण मंदिर मंडपाबद्दल माहिती तसेच या भागातील पीकपाणी यांची माहिती दिली आहे. राकसकोप गावातील मोरे बंधू यात्रा करणार आहेत. राकसकोप धरण, भीमसेन टेकडी व राकसकोप गावातील मंदिरांची माहिती दिली आहे. कावळेवाडीतील चव्हाटा देवस्थानचा महिमा, तसेच मोहन मोरे यांनी उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याची माहिती या पुरवणीद्वारे दिली आहे. बिजगर्णी ग्रा. पं. च्या विविध विकासकामांची माहितीही प्रसिद्ध केली आहे. या तिन्ही गावांतील मंदिरे व इतिहास या पुरवणीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचल्यामुळे भारत लाईव्ह न्यूज मीडियाच्या पुरवणीचे कौतुक करण्यात आले. महालक्ष्मीदेवीच्या मंडपामध्ये पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले. प्रारंभी वार्ताहर आण्णाप्पा पाटील यांनी प्रास्ताविक करून पुरवणीत दिलेली माहिती सांगितली. ग्रा. पं. अध्यक्ष मनोहर बेळगावकर, एपीएमसी माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, यात्रा कमिटी सेक्रेटरी चांगदेव जाधव, कल्लाप्पा यळ्ळूरकर, ग्रा. पं. सदस्य संतोष कांबळे, परशराम भास्कळ, मारुती जाधव, रामलिंग मोरे आदींच्या हस्ते पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले. पुरवणीतून तिन्ही गावांची माहिती दिल्याबद्दल मनोहर बेळगावकर व निंगाप्पा जाधव यांनी भारत लाईव्ह न्यूज मीडियाचे आभार मानले. यावेळी मल्लाप्पा मोरे, प्रतिक सुतार, अनिल हलकर्णीकर,  यात्रा कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.