ओडीशा, बेंगळूर एफसी एकाच गटात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भुवनेश्वरमध्ये 9 ते 28 जानेवारी दरम्यान होणाऱ्या सुपर चषक फुटबॉल स्पर्धेसाठी काढण्यात आलेल्या ड्रॉमध्ये विद्यमान विजेते ओडीशा एफसी आणि बेंगळूर एफसी यांचा एकाच गटात समावेश झाला आहे. एफसी गोवा संघ ड गटात आहे. या गटामध्ये एकूण चार संघांचा समावेश राहिल.
या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघांचा समावेश असून ते चार गटात विभागण्यात आले आहेत. प्रत्येक गटात चार संघ राहतील. प्रत्येक गटातील आघाडीचे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. 28 जानेवारीला अंतिम सामना खेळविला जाईल. गोकुळाम, केरळ एफसी, श्रीनिधी डेक्कन एफसी, शिलाँग लेजाँग एफसी, इंटरकाशी आणि राजस्थान युनायटेड एफसी या संघांचा सहभाग निश्चित असल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी ओडीशा, बेंगळूर एफसी एकाच गटात
ओडीशा, बेंगळूर एफसी एकाच गटात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भुवनेश्वरमध्ये 9 ते 28 जानेवारी दरम्यान होणाऱ्या सुपर चषक फुटबॉल स्पर्धेसाठी काढण्यात आलेल्या ड्रॉमध्ये विद्यमान विजेते ओडीशा एफसी आणि बेंगळूर एफसी यांचा एकाच गटात समावेश झाला आहे. एफसी गोवा संघ ड गटात आहे. या गटामध्ये एकूण चार संघांचा समावेश राहिल. या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघांचा समावेश असून ते चार गटात विभागण्यात आले […]