ओट्स पनीर टिक्की रेसिपी
साहित्य-
तीन कप ओट्स
एक कप पनीर
100 ग्रॅम बीन्स
दोन कप गाजर
तीन हिरव्या मिरच्या
दीड चमचा तिखट
दीड चमचा धणे पूड
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
कृती-
सर्वात आधी गाजर, बीन्स आणि हिरव्या मिरची स्वच्छ धुवून चिरून घ्या. आता ओट्स ब्लेंडरमध्ये बारीक करून पावडर बनवा आणि पनीर किसून घ्या. एका बाऊलमध्ये सर्व भाज्या, पनीर आणि ओट्स पावडर मिक्स करावी व मसाले घालावे. टिक्की बनवण्यासाठी पीठ चांगले मिक्स करून घ्यावे. आता हे 10 मिनिटे ठेवावे. यानंतर बॉल बनवून त्याला टिक्कीच्या आकार द्यावा. आता तव्यावर तेल लावावे. व तव्यावर टिक्की ठेऊन फ्राय करावी. टिक्की हलक्या तपकिरी होईपर्यंत तळून घ्याव्या. सर्व टिक्की त्याच प्रकारे तयार करा. तर चला तयार आहे आपली ओट्स पनीर टिक्की रेसिपी. तुमच्या आवडत्या चटणीसोबत किंवा सॉस सोबत सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik