थंडगार ओट्स कुल्फी रेसिपी
साहित्य-
४ चमचे साधे ओट्स
एक हिरवी वेलची
१० काजू, बदाम
मनुके
२ कप टोन्ड दुध
केशर
गूळ
मध
ALSO READ: Strawberry Kulfi उन्हाळ्यात बनवा टेस्टी स्ट्रॉबेरी कुल्फी
कृती-
सर्वात आधी साधे ओट्स,वेलची आणि काजू, बदाम आणि मनुके मिक्सरमध्ये घालून चांगले बारीक करावे.आता दुधात चिमूटभर केशर भिजवावे. एका भांड्यात ओट्स-वेलची-ड्रायफ्रूट्स पावडर आणि केशर दूध घ्या आणि नंतर सर्वकाही चांगले मिसळा. हे मिश्रण गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. हे मिश्रण सुमारे ३ मिनिटे उकळू द्या.आता या मिश्रणात एक चमचा गूळ आणि ३ चमचे मध घाला आणि मिक्स करा. आता हे मिश्रण थोडे घट्ट होऊ द्या. ओट्स कुल्फीमध्ये काही केशराचे धागे आणि बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स घालावे. यानंतर कुल्फीचे मिश्रण थंड झाल्यावर ते कुल्फीच्या साच्यात ठेवा. आता तुम्ही ओट्स कुल्फी ६-९ तास फ्रीजरमध्ये गोठवण्यासाठी ठेवावी.आता फ्रिज मधून बाहेर काढून सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik