हिवाळ्यात बनवा टोमॅटो आणि गाजराचे पौष्टिक सूप रेसिपी
साहित्य-
लाल टोमॅटो – ४-५ मध्यम आकाराचे
गाजर -२ मध्यम आकाराचे
कांदा-१/२ बारीक चिरलेला
लसूण पाकळ्या-२-३
आले-१ इंच तुकडा
बटर किंवा तेल-१ मोठा चमचा
पाणी किंवा व्हेजिटेबल स्टॉक-२ ते ३ कप
साखर-१ लहान चमचा
मीठ चवीनुसार
मिरी पूड- चवीनुसार
क्रीम
कोथिंबीर
ALSO READ: Amla-Ginger Soup Recipe आरोग्यवर्धक आवळा-आल्याचे सूप
कृती-
सर्वात आधी एका पॅनमध्ये बटर किंवा तेल गरम करा. त्यात कांदा घालून हलका गुलाबी होईपर्यंत परता.
आता लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडा घालून काही सेकंद परता. तसेच लगेच टोमॅटोचे तुकडे आणि गाजराचे तुकडे घाला. आता त्यात मीठ आणि मिरी पूड घालून चांगले मिसळा. आता भाज्यांमध्ये २ ते ३ कप पाणी किंवा व्हेजिटेबल स्टॉक घाला. पॅन झाकून ठेवा आणि गाजर पूर्णपणे मऊ होईपर्यंत १५ मिनिटे शिजवा. आता गॅस बंद करा आणि मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेऊन एकदम बारीक वाटून घ्या. वाटलेले सूप एका मोठ्या गाळणीतून गाळून घ्या. गाळलेले सूप परत पॅनमध्ये घाला आता त्यात १ लहान चमचा साखर घालून ढवळा आणि उकळी येऊ द्या. चव तपासा व आवश्यक असल्यास मीठ घाला. तयार सूप बाऊलमध्ये काढा.वरतून ताजी क्रीम आणि कोथिंबीर घालून सजवा. तर चला तयार आहे आपले पौष्टिक असे टोमॅटो आणि गाजराचे सूप रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: दही पालक सूप रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: हिवाळ्यासाठी खास: कमी कॅलरीजचे देसी सूप! वजन कमी करण्यासाठी आणि थंडीत ऊब देण्यासाठी बनवा ‘ही’ खास डाळ सूप रेसिपी
