एनटीपीसीने केले विक्रमी ऊर्जा उत्पादन
422 अब्ज युनिटचे उत्पादन : समभाग वधारला
नवी दिल्ली :
भारतातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती कंपनी एनटीपीसीने मागच्या वर्षी म्हणजेच 2023-24 आर्थिक वर्षात विक्रमी 422 अब्ज युनिट इतकी ऊर्जा निर्मिती केली असल्याची माहिती समोर आली आहे. याआधीच्या वर्षाच्या तुलनेत ऊर्जा उत्पादनात कंपनीने 6 टक्के वाढ नोंदवली आहे.
कोळशापासून ऊर्जा निर्मितीत 77 टक्के क्षमता कंपनीने सिद्ध केली असून एकाच दिवसात कंपनीने 1428 दशलक्ष युनिटचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. याबातमीनंतर मंगळवारी एनटीपीसीच्या समभागात चांगली तेजी दिसून आली होती. 345 रुपयांचा स्तर कंपनीने पार केला असून 3.345 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाची ही कंपनी आहे.
उत्तम परतावा
याचदरम्यान गेल्या एक वर्षात एनटीपीसीने गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा देऊ शकली आहे. 6 महिन्यात समभागाने 51 टक्के इतका परतावा दिलाय. गेल्या 5 दिवसात समभाग 6 टक्के वाढलाय. 20 मार्चला समभागाचा भाव 313 रुपये इतका होता. आता पाहता समभाग 10 टक्के इतका वाढला आहे. दीर्घकालीन विचार करता कंपनीने गुंतवणूकदारांना 5 वर्षात 155 टक्के गुंतवणूकदारांना परतावा दिला आहे.
Home महत्वाची बातमी एनटीपीसीने केले विक्रमी ऊर्जा उत्पादन
एनटीपीसीने केले विक्रमी ऊर्जा उत्पादन
422 अब्ज युनिटचे उत्पादन : समभाग वधारला नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती कंपनी एनटीपीसीने मागच्या वर्षी म्हणजेच 2023-24 आर्थिक वर्षात विक्रमी 422 अब्ज युनिट इतकी ऊर्जा निर्मिती केली असल्याची माहिती समोर आली आहे. याआधीच्या वर्षाच्या तुलनेत ऊर्जा उत्पादनात कंपनीने 6 टक्के वाढ नोंदवली आहे. कोळशापासून ऊर्जा निर्मितीत 77 टक्के क्षमता कंपनीने सिद्ध […]