‘एनटीए’कडून नीट-युजी फेरपरीक्षा निकाल जाहीर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) सोमवारी नीट-युजी 2024च्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार आता अधिकृत वेबसाईटवर तपशील तपासू शकतात. फेरपरीक्षेत टॉपरला 680 गुण मिळाले आहेत, तर याच विद्यार्थ्याला पूर्वीच्या परीक्षेत 720 गुण मिळाले होते. आता निकाल जाहीर झाल्यानंतर समुपदेशन प्रक्रिया सुरू होईल. परीक्षा उत्तीर्ण होणारे उमेदवार 6 जुलै रोजी […]

‘एनटीए’कडून नीट-युजी फेरपरीक्षा निकाल जाहीर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) सोमवारी नीट-युजी 2024च्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार आता अधिकृत वेबसाईटवर तपशील तपासू शकतात. फेरपरीक्षेत टॉपरला 680 गुण मिळाले आहेत, तर याच विद्यार्थ्याला पूर्वीच्या परीक्षेत 720 गुण मिळाले होते. आता निकाल जाहीर झाल्यानंतर समुपदेशन प्रक्रिया सुरू होईल. परीक्षा उत्तीर्ण होणारे उमेदवार 6 जुलै रोजी होणाऱ्या समुपदेशनात सहभागी होतील. ग्रेस मार्क्स आणि पेपर लीक समस्यांमुळे प्रभावित झालेल्या 1,563 उमेदवारांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, केवळ 813 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ही परीक्षा 23 जून 2024 रोजी दुपारी 2:00 ते 5:20 या वेळेत घेण्यात आली होती.