प्रियांका जारकीहोळी यांना एनएसयूआयचा पाठिंबा

घरोघरी जावून प्रचार करण्याचा निर्णय बेळगाव : चिकोडी लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारासाठी भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचा पाठिंबा मिळाला आहे. मतदारसंघात प्रचार करून काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन हा निर्णय घेतला. चिकोडी लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना निवडून आणण्यासाठी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जावून मतदारांना आवाहनाचा निर्णय […]

प्रियांका जारकीहोळी यांना एनएसयूआयचा पाठिंबा

घरोघरी जावून प्रचार करण्याचा निर्णय
बेळगाव : चिकोडी लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारासाठी भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचा पाठिंबा मिळाला आहे. मतदारसंघात प्रचार करून काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन हा निर्णय घेतला. चिकोडी लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना निवडून आणण्यासाठी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जावून मतदारांना आवाहनाचा निर्णय बैठकीत घेतला. यावेळी विद्यार्थी संघटना पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघात प्रचारतंत्र राबविण्यावर प्रदीर्घ चर्चा केली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष चेतन होनगोळ म्हणाले, बदलाचे वारे सुरू आहेत. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पूरक वातावरण असून चिकोडी लोकसभा मतदारसंघातून प्रियांका जारकीहोळी निश्चित विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्य सरकारच्या गॅरंटी योजना मतदारांच्या पसंतीस उतरल्या आहेत. सर्व जाती-जमातीच्या नागरिकांना त्यांचा लाभ होत आहे. यावेळी तालुका अध्यक्ष प्रज्वल दानप्पगोळ, उपाध्यक्ष शेषदरी डोळके, उमेश चलवादी, दस्तगीर बागवान आदी उपस्थित होते.