टीव्ही पाहण्यास आता जादा पैसे द्यावे लागणार
सबस्क्रिप्शन दर 8 टक्क्यांनी वाढणार असल्याचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी काळात टीव्ही पाहणाऱ्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. कारण लवकरच तुम्हाला टीव्ही पाहण्यासाठी अधिक सबक्रिप्शन शुल्क (टीव्ही चॅनल सबक्रिप्शन) द्यावे लागणार आहे. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म त्यांचे दर वाढवणार आहेत. सोनी पिक्चअर नेटवर्क इंडिया, झी एंटरटेन्मेट, डिस्ने स्टार, व्हिकॉम18 येत्या काळात त्यांचे दर वाढवू शकतात.
ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री
यामुळे टीव्ही सबक्रिप्शनचा दर 5 ते 8 टक्क्यांनी वाढू शकतो, असे मानले जात आहे. तुम्ही सध्या टीव्ही पाहण्यासाठी मासिक सबक्रिप्शनसाठी 500 रुपये भरल्यास, हा दर सुमारे 40 रुपयांनी वाढू शकतो. तुम्ही महिन्यासाठी सदस्यता म्हणून 1000 रुपये खर्च केल्यास, तुम्हाला अतिरिक्त 80 रुपये द्यावे लागतील.
टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायने ब्रॉडकास्टर्सना सांगितले होते की जर त्यांनी लोकसभा निवडणुका संपेपर्यंत नवीन दर करारावर स्वाक्षरी केली नाही तर अशा वितरक प्लॅटफॉर्म ऑपरेटरने सिग्नल बंद करू नयेत. वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारीमध्ये, आघाडीच्या ब्रॉडकास्टरने त्याच्या बेस बुके रेटमध्ये वाढ केली होती. जी सुमारे 10 टक्के इतकी होती.
भाव कधी वाढणार?
टीव्ही चॅनल मार्केटमध्ये मनोरंजन आणि क्रिकेट चॅनल्सचा सुमारे 25 टक्के वाटा आहे. जानेवारीत दरवाढीची घोषणा झाली तेव्हा फेब्रुवारीपासून नवीन दर लागू होऊ शकतात, असे बोलले जात होते. मात्र लोकसभा निवडणुकीमुळे दरवाढीचा निर्णय रखडला होता.
Home महत्वाची बातमी टीव्ही पाहण्यास आता जादा पैसे द्यावे लागणार
टीव्ही पाहण्यास आता जादा पैसे द्यावे लागणार
सबस्क्रिप्शन दर 8 टक्क्यांनी वाढणार असल्याचे संकेत वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आगामी काळात टीव्ही पाहणाऱ्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. कारण लवकरच तुम्हाला टीव्ही पाहण्यासाठी अधिक सबक्रिप्शन शुल्क (टीव्ही चॅनल सबक्रिप्शन) द्यावे लागणार आहे. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म त्यांचे दर वाढवणार आहेत. सोनी पिक्चअर नेटवर्क इंडिया, झी एंटरटेन्मेट, डिस्ने स्टार, व्हिकॉम18 येत्या काळात त्यांचे दर वाढवू शकतात. ग्राहकांच्या […]