आता विद्यालयांच्या वेळेत एका तासाने होणार वाढ

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भाग पणजी : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास सामोरे जाणाऱ्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना आणि कालांतराने इतर इयत्तेच्या मुलांना देखील शाळेत जास्त वेळ बसावे लागणार आहे. ही जादा वेळ कुठे वाढवावी, यासाठी आता शाळांची, मुख्यध्यापकांची, मुलांची, शिक्षकांची खरी कसोटी लागणार आहे. यंदा नववीपासून हे धोरण लागू होणार असल्याने त्या इयत्तेतील मुलांना, शिक्षकांना त्याचा […]

आता विद्यालयांच्या वेळेत एका तासाने होणार वाढ

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भाग
पणजी : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास सामोरे जाणाऱ्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना आणि कालांतराने इतर इयत्तेच्या मुलांना देखील शाळेत जास्त वेळ बसावे लागणार आहे. ही जादा वेळ कुठे वाढवावी, यासाठी आता शाळांची, मुख्यध्यापकांची, मुलांची, शिक्षकांची खरी कसोटी लागणार आहे. यंदा नववीपासून हे धोरण लागू होणार असल्याने त्या इयत्तेतील मुलांना, शिक्षकांना त्याचा खरा अनुभव मिळणार आहे. त्यातूनच हे धोरण पुढे नेले जाणार आहे. गोव्यातील शाळांची वेळ सध्या सर्वसाधारण सकाळी पावणे आठ ते दुपारी सव्वा एक अशी आहे. त्यात काही शाळांची वेळ थोडी मागेपुढे असू शकते. नवीन धोरणानुसार त्यात एका तासाने वाढ होणार आहे. सध्याच्या वेळेनुसार शाळांचे कामकाज प्रतिदिन साडेपाच तास असून ते नवीन धोरणाप्रमाणे साडेसहा तास करावे लागणार आहे. त्यामुळे शाळा एक तर एका तासाने अगोदर सुरू कराव्या लागतील किंवा एका तासाने उशिरा सोडाव्या लागतील, अशी परिस्थिती आहे. एका तासाने वाढ होणार असल्याने मुलांवर, शिक्षकांवर त्याचे काय परिणाम होतील हे धोरण लागू झाल्यानंतर समोर येणार आहे.