म.ए.समितीच्या नेत्यांना चंदगड पोलिसांकडून नोटिसा

बेळगाव : कर्नाटक सरकारने सुवर्णविधानसौध येथे अधिवेशन घेतल्यानंतर म. ए. समितीने बेळगावात महामेळावा घेण्याचे ठरविले. मात्र महामेळाव्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे शिनोळी येथे रास्तारोको करून मेळावा भरविला. यामुळे चंदगड पोलिसांनी म. ए. समितीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना बुधवार दि. 6 रोजी पोलीस स्थानकात हजर राहून म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. त्यामुळे म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांतून तीव्र नाराजी […]

म.ए.समितीच्या नेत्यांना चंदगड पोलिसांकडून नोटिसा

बेळगाव : कर्नाटक सरकारने सुवर्णविधानसौध येथे अधिवेशन घेतल्यानंतर म. ए. समितीने बेळगावात महामेळावा घेण्याचे ठरविले. मात्र महामेळाव्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे शिनोळी येथे रास्तारोको करून मेळावा भरविला. यामुळे चंदगड पोलिसांनी म. ए. समितीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना बुधवार दि. 6 रोजी पोलीस स्थानकात हजर राहून म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. त्यामुळे म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी बेळगावात सुवर्णविधानसौधची उभारणी केली. त्या ठिकाणी अधिवेशने भरविली. मराठी भाषिकांनीही म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली महामेळावे भरविले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून मेळावा भरविण्यास परवानगी नाकारली. म. ए. समितीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक केली होती. 2023 मध्येही मेळावा भरविण्याचे ठरविण्यात आले. मात्र परवानगी नाकारली. म. ए. समितीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिनोळीमध्ये मेळावा भरविण्याचे ठरविले. त्यानुसार त्या ठिकाणी रास्तारोको करून मेळावा भरविला. मात्र कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला म्हणून माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, मनोज पावशे, विजय देवणे, प्रभाकर खांडेकर, विक्रम मुतकेकर, रमाकांत कोंडुस्कर, शुभम शेळके, चंद्रकांत कोंडुस्कर, सरिता पाटील यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता चंदगड पोलीस स्थानकामध्ये साऱ्यांना हजर रहावे लागणार आहे. यामुळे सीमाभागातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.