गाशा गुंडाळलेल्या ट्रूजेट विमान कंपनीला नोटीस
विमानतळ प्राधिकरणाची कारवाई, 31 जुलैपूर्वी थकीत भाडे भरण्याची सूचना
बेळगाव : काही वर्षांपूर्वी बेळगावमधून गाशा गुंडाळलेल्या ट्रूजेट या विमान कंपनीच्या टर्बो मेगा एअरवेज प्रा. लि. या कंपनीला विमानतळ प्रशासनाने नोटीस बजावली आहे. बेळगाव विमानतळाची थकीत रक्कम भरून विमानतळ परिसरात असणारे साहित्य 31 जुलैपूर्वी उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा त्यानंतर हे साहित्य निविदा काढून विक्री केले जाणार आहे. कोरोनापूर्वी बेळगावमधून ट्रूजेट ही विमान कंपनी सेवा देत होती. सर्वात कमी तिकीट दर आकारत असल्यामुळे या विमान कंपनीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या विमान कंपनीने वर्षभरात तिरुपती, हैदराबाद, कडप्पा व म्हैसूर या शहरांना बेळगावमधून सेवा सुरू ठेवली होती.
परंतु कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये मोठी उलाढाल झाल्यामुळे या कंपनीने संपूर्ण देशातील विमानसेवा टप्प्याटप्प्याने थांबवली. विमानसेवा बंद होऊन चार वर्षे उलटली तरी अद्याप या विमान कंपनीने बेळगाव विमानतळाचे थकीत भाडे दिलेले नाही. तसेच या कंपनीचे इतर साहित्यही विमानतळावरच पडून आहे. अनेकवेळा संपर्क साधूनही कंपनीकडून योग्य प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या चेन्नई येथील कार्यालयाने जाहीर नोटीस देऊन कंपनीला 31 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर निविदा काढून साहित्याची विक्री केली जाणार असल्याचा इशारा कंपनीला दिला आहे.
Home महत्वाची बातमी गाशा गुंडाळलेल्या ट्रूजेट विमान कंपनीला नोटीस
गाशा गुंडाळलेल्या ट्रूजेट विमान कंपनीला नोटीस
विमानतळ प्राधिकरणाची कारवाई, 31 जुलैपूर्वी थकीत भाडे भरण्याची सूचना बेळगाव : काही वर्षांपूर्वी बेळगावमधून गाशा गुंडाळलेल्या ट्रूजेट या विमान कंपनीच्या टर्बो मेगा एअरवेज प्रा. लि. या कंपनीला विमानतळ प्रशासनाने नोटीस बजावली आहे. बेळगाव विमानतळाची थकीत रक्कम भरून विमानतळ परिसरात असणारे साहित्य 31 जुलैपूर्वी उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा त्यानंतर हे साहित्य निविदा काढून विक्री केले जाणार आहे. कोरोनापूर्वी बेळगावमधून ट्रूजेट […]