प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारखानदारांना सूचना

बेळगाव :  जिल्ह्यातील विविध कारखान्यात जमा होणारा घनकचरा, ई-कचरा व प्लास्टिक कचऱ्याच्या योग्य निर्मूलनासाठी दि. 28 मार्च रोजी कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. कचरा निर्मूलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर  कारवाई करण्याचा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला. ऑटोनगर येथील कर्नाटक प्रदूषण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयात जिल्ह्यातील वेगवेगळ्या कारखान्यांच्या प्रतिनिधींना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी शोभा पोळ यांनी मार्गदर्शन केले. […]

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारखानदारांना सूचना

बेळगाव :  जिल्ह्यातील विविध कारखान्यात जमा होणारा घनकचरा, ई-कचरा व प्लास्टिक कचऱ्याच्या योग्य निर्मूलनासाठी दि. 28 मार्च रोजी कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. कचरा निर्मूलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर  कारवाई करण्याचा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला. ऑटोनगर येथील कर्नाटक प्रदूषण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयात जिल्ह्यातील वेगवेगळ्या कारखान्यांच्या प्रतिनिधींना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी शोभा पोळ यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक कारखान्याचा परिसर स्वच्छ ठेवावा, जमा होणाऱ्या घनकचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने करावी. न हून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वैज्ञानिक अधिकारी डॉ. गौडप्पा एम. पाटील यांनी स्वागत केले. राजश्री कोळ्ळी यांनी आभार मानले.