बांगलादेश नजीकच्या सीमेवर दक्षता बाळगण्याची सूचना

आगरतळा : बांगला देशात सध्या भयानक हिंसाचार होत आहे. त्यामुळे त्या देशातून भारतात पुन्हा मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होण्याची शक्यता आहे. ही संभाव्य घुसखोरी टाळण्यासाठी केंद्र सरकारने त्रिपुरा आणि बांगला देश यांच्या मधील सीमारेषेवर काटेकोरपणे लक्ष ठेवावे, अशी महत्वपूर्ण सूचना त्रिपुरातील तिप्रा मोथा या राजकीय पक्षाचे प्रमुख नेते प्रद्योत किशोर माणिक्य देबवर्मा यांनी केली आहे. तिप्रा […]

बांगलादेश नजीकच्या सीमेवर दक्षता बाळगण्याची सूचना

आगरतळा : बांगला देशात सध्या भयानक हिंसाचार होत आहे. त्यामुळे त्या देशातून भारतात पुन्हा मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होण्याची शक्यता आहे. ही संभाव्य घुसखोरी टाळण्यासाठी केंद्र सरकारने त्रिपुरा आणि बांगला देश यांच्या मधील सीमारेषेवर काटेकोरपणे लक्ष ठेवावे, अशी महत्वपूर्ण सूचना त्रिपुरातील तिप्रा मोथा या राजकीय पक्षाचे प्रमुख नेते प्रद्योत किशोर माणिक्य देबवर्मा यांनी केली आहे. तिप्रा मोथा हा राजकीय पक्ष केंद्रात सत्तेवर असणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सदस्य पक्ष आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी या पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश करुन भारतीय जनता पक्षाशी युती केली होती. या युतीमुळे भारतीय जनता पक्षाने या राज्यातील दोन्ही लोकसभा जागांवर मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळविला होता. जेव्हा बांगला देशात सामाजिक कलह निर्माण होतो किंवा अराजकासारखी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा त्या देशामधून त्रिपुरात घुसखोरी होते आणि त्यामुळे राज्याची सुरक्षा संकटात येते, असे आजवरच्या इतिहासाने दाखवून दिले आहे. यंदाही अशीच स्थिती बांगला देशात आहे. त्यामुळे दक्षता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केंद सरकारला केले आहे.