तुमच्या हातचे बाहुले नाही

तैवानला चीनला सुनावले : भारतीय प्रसारमाध्यमाला मुलाखत देण्याचा मुद्दा वृत्तसंस्था/ तैपेई भारतातील चिनी दूतावासाने तैवानचे विदेशमंत्री जोसेफ वू यांनी एका भारतीय वाहिनीला दिलेल्या मुलाखतीवर आक्षेप घेतला आहे. भारतीय प्रसारमाध्यमाने तैवानच्या स्वातंत्र्यावर बोलण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध केल्याचा आरोप चीनने केला. याच्या प्रत्युत्तरादाखल भारत आणि तैवान हे स्वतंत्र आणि जिवंत प्रसारमाध्यमं असलेल्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व करतात असे तैवानने सुनावले […]

तुमच्या हातचे बाहुले नाही

तैवानला चीनला सुनावले : भारतीय प्रसारमाध्यमाला मुलाखत देण्याचा मुद्दा
वृत्तसंस्था/ तैपेई
भारतातील चिनी दूतावासाने तैवानचे विदेशमंत्री जोसेफ वू यांनी एका भारतीय वाहिनीला दिलेल्या मुलाखतीवर आक्षेप घेतला आहे. भारतीय प्रसारमाध्यमाने तैवानच्या स्वातंत्र्यावर बोलण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध केल्याचा आरोप चीनने केला. याच्या प्रत्युत्तरादाखल भारत आणि तैवान हे स्वतंत्र आणि जिवंत प्रसारमाध्यमं असलेल्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व करतात असे तैवानने सुनावले आहे.
भारत तैवानसंबंधी ‘एक चीन धोरणा’चे पालन करतो आणि तैवानसोबत भारताचे औपचारिक राजनयिक संबंध नाहीत. 29 फेब्रुवारी रोजी काही भारतीय वाहिन्यांनी तैवानचे विदेशमंत्री जोसेफ वू यांची मुलाखत प्रसारित केली. या टीव्ही वाहिन्यांनी तैवानच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासाठी आणि चुकीची माहिती फैलावण्यासाठी व्यासपीठ पुरविले आहे. हा प्रकार एक चीन धोरणाचे गंभीर उल्लंघन करणारा असून पूर्णपणे अस्वीकारार्ह असल्याचे चीनच्या दूतावासाकडून म्हटले गेले होते.
जगात केवळ एकच चीन आहे. तैवान हा चीनचा हिस्सा आहे. पीपल्स रिपब्लिकन ऑफ चायनाचे सरकार पूर्ण चीनचे प्रतिनिधित्व करणारे एकमात्र कायदेशीर सरकार असल्याचे चिनी दूतावासाने म्हटले आहे. तसेच चीनने स्पष्टपणे तैवानचे अस्तित्वच नाकारले आहे. परंतु तैवानमध्ये एक निवडून आलेले सरकार कार्यरत आहे.
भारत तसेच तैवान हा पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचा हिस्सा नाही. तसेच आम्ही त्याच्या हातचे बाहुले देखील नाही. भारत आणि तैवान हे दोन्ही देश मुक्त आणि जिवंत प्रसारमाध्यमं असणारी लोकशाही धारण करणारे आहेत. आम्हाला कुठल्याही देशाकडून निर्देशित केले जाऊ शकत नाही. चीनने शेजाऱ्यांना धमकाविणे बंद करावे असे तैवानकडून सुनावण्यात आले