भोसरी जमीन व्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे दाम्पत्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटजारी

पुण्यातील बहुचर्चित भोसरी एमआयडीसीजमीन खरेदी-विक्री प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईतील विशेष एमपी-एमएलए न्यायालयाने एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या …

भोसरी जमीन व्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे दाम्पत्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटजारी

पुण्यातील बहुचर्चित भोसरी एमआयडीसीजमीन खरेदी-विक्री प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईतील विशेष एमपी-एमएलए न्यायालयाने एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

ALSO READ: आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध गंभीर द्वेषपूर्ण भाषणाचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

भोसरी येथे एमआयडीसीच्या जमीन व्यवहारात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप खडसे यांच्यावर असून या प्रकरणाचा तपास ईडीने केला असून खडसे दांपत्य आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या विरोधात तसेच काही संबंधित कंपन्यांच्या विरोधात सुमारे एक हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले असून या सर्वांवर मनी लॉन्ड्रिंगसह आर्थिक अनियमत्तेचे गंभीर आरोप दाखल करण्यात आले. विशेष न्यायालयाकडून या पूर्वी खडसे यांच्या दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला आहे.
 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी मुंबईतील विशेष सत्र न्यायालयात या प्रकरणाची म्हह्त्त्वाची सुनावणी नियोजित केली. या सुनावणीमध्ये खडसे यांच्यावर औपचारिक आरोप निश्चित केले जाणार होते. मात्र सुनावणीच्या दिवशी खडसे दांम्पत्य न्यायालयात उपस्थित झाले नाही. त्यांच्या अनुपस्थित गंभीर दखल घेत न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जाहीर केला. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे. 

ALSO READ: पुण्यातील पुरंदर तहसीलमध्ये विमानतळासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अंतिम मुदत निश्चित केली
या प्रकरणाला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच नकार दिला आहे. त्यामुळे सत्र न्यायालयातील कारवाई कोणत्याही अडथळ्याविना सुरू आहे. खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांचा जामीन अर्जही नुकताच फेटाळण्यात आला असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Edited By – Priya Dixit

 

Go to Source