लोकसभा निवडणुकीसाठी 12 पासून उमेदवारी अर्ज स्वीकारणार

22 एप्रिलला चित्र होणार स्पष्ट : प्रत्यक्ष मतदान होणार 7 मे रोजी पणजी : गोव्यातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम येत्या शुक्रवारपासून म्हणजे 12 एप्रिल रोजी सुरू होणार आहे. त्या दिवसापासून अर्ज स्विकारले जाणार असून 19 एप्रिल हा अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. 20 एप्रिल रोजी अर्जाची छाननी होणार असून 22 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार […]

लोकसभा निवडणुकीसाठी 12 पासून उमेदवारी अर्ज स्वीकारणार

22 एप्रिलला चित्र होणार स्पष्ट : प्रत्यक्ष मतदान होणार 7 मे रोजी
पणजी : गोव्यातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम येत्या शुक्रवारपासून म्हणजे 12 एप्रिल रोजी सुरू होणार आहे. त्या दिवसापासून अर्ज स्विकारले जाणार असून 19 एप्रिल हा अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. 20 एप्रिल रोजी अर्जाची छाननी होणार असून 22 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर 15 दिवसांनी म्हणजे 7 मे रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी एका महिन्याचा कालावधी बाकी राहिला असून भाजप, काँग्रेस व आरजीपी या तिन्ही पक्षांनी गोव्यातील दोन्ही मतदारसंघांत आपापले उमेदवार जाहीर पेले असून त्यांचा प्रचारही सुरू झाला आहे. रखरखीत उन्हाळ्यात ही लोकसभा निवडणूक होणार असून किती टक्के मतदान होते यालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. मे महिन्याच्या सुटीत अनेकजण आपापल्या गावी, नातेवाईकांकडे तसेच पर्यटनासाठी जातात. शिवाय मतदानाचा दिवस हा मंगळवारी आला असून सोमवारी सुटी घेतली तर सरकारी कर्मचारी, अधिकारी वर्ग यांना शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार अशी सलग चार दिवस सुटी मिळणार आहे. मंगळवारी खास मतदानासाठीच सुटी जाहीर करण्यात आली आहे. उष्ण तापमान असल्याने दुपारच्या कडक उन्हात मतदान कमी होण्याची शक्यता दिसून येते. सकाळी लवकर किंवा सायंकाळी मतदानासाठी गर्दी होण्याची जास्त शक्यता आहे. शिवाय दोन्ही मतदारसंघांत महिला मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे महिला ज्या उमेदवारास मत देतील तो जिंकण्याची संधी जास्त आहे. दक्षिण गोव्यात भाजपची एकमेव महिला उमेदवार असून उत्तर गोव्यात दोन ज्येष्ठ उमेदवारांमध्ये सामना रंगणार आहे. खरा सामना काँग्रेस व भाजप यांच्यातच होणार असल्याचे चित्र आहे.