लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज
पणजी : लोकसभा निवडणुकीसाठीची प्रत्यक्ष रणधुमाळी आजपासून सुरू होत आहे. आज सकाळी राज्यपालांच्या अधिसूचनेनंतर उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होईल. दि. 19 एप्रिल हा उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. गोव्यातील दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टी विऊद्ध काँग्रेसचे उमेदवार अशा पद्धतीची दोन्ही ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे. आप व इतर पक्ष आपला उमेदवार उभा करणार नाही. ते सर्वजण काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीबरोबर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष उभा राहिला आहे. त्यामुळे उत्तर गोव्यात भाजप विऊद्ध काँग्रेस व दक्षिण गोव्यात देखील भाजप विऊद्ध काँग्रेस अशा लढती होतील. रिव्होल्युशनरी गोवन्स या स्थानिक पक्षानेही दोन्ही मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचे या अगोदरच जाहीर केलेले आहे. या पक्षाचा सांतआंद्रेमध्ये एकमेव आमदार आहे.
Home महत्वाची बातमी लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज
लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज
पणजी : लोकसभा निवडणुकीसाठीची प्रत्यक्ष रणधुमाळी आजपासून सुरू होत आहे. आज सकाळी राज्यपालांच्या अधिसूचनेनंतर उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होईल. दि. 19 एप्रिल हा उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. गोव्यातील दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टी विऊद्ध काँग्रेसचे उमेदवार अशा पद्धतीची दोन्ही ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे. आप व इतर पक्ष आपला उमेदवार उभा […]
