लोकसभेसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज प्रक्रिया

पणजी : राज्यातील दोन लोकसभा मतदारसंघासाठी येत्या दि. 7 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उद्या दि. 12 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. 19 पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. या निवडणुकीसाठी उत्तर गोव्यातून विद्यमान खासदार श्रीपाद नाईक हे तब्बल सहाव्यांदा भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवत आहेत. दक्षिण गोव्यातून भाजपने प्रथमच राजकारणात पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध उद्योजक […]

लोकसभेसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज प्रक्रिया

पणजी : राज्यातील दोन लोकसभा मतदारसंघासाठी येत्या दि. 7 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उद्या दि. 12 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. 19 पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. या निवडणुकीसाठी उत्तर गोव्यातून विद्यमान खासदार श्रीपाद नाईक हे तब्बल सहाव्यांदा भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवत आहेत. दक्षिण गोव्यातून भाजपने प्रथमच राजकारणात पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध उद्योजक पल्लवी धेंपे यांना उमेदवारी दिली आहे. इंडिया आघाडीतर्फे काँग्रेसनेही आपले उमेदवार जाहीर केले असून उत्तरेत रमाकांत खलप आणि दक्षिणेत विरियातो फर्नांडीस यांची निवड केली आहे. रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षानेही निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केली असून उत्तर गोव्यातून स्लत: पक्षाध्यक्ष मनोज परब निवडणूक लढविणार आहे. दरम्यान, दि. 20 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून दि. 22 रोजी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर 7 मे रोजी निवडणूक आणि 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.