वाहनांच्या मागे सायकल कॅरिअर बसवणाऱ्यांवर कारवाई नाही
परिवहन आयुक्तांचे परिपत्रकानुसार जर सायकल कैरिअर (cycle carrier) अशा प्रकारे बसवलेले जेणेकरून वाहनामागील इतर वाहनांना कोणताही त्रास किंवा अडथळा निर्माण होणार नाही, तर अशा वाहनांवर (vehicles) कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. याबाबत सविस्तर माहिती परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी एका प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.पर्यावरणास अनुकूल, व्यायामाचे साधन असण्यासोबतच, कोणत्याही ठिकाणी सहज पोहोचता येते. यासाठी, जगातील अनेक देशांमध्ये बरेच लोक वाहन न वापरता सायकलचा वापर करतात, यासाठी अनेक वाहन मालक त्यांच्या वाहनामागे सायकल कैरिअर बसवून सायकल वाहून नेण्यासाठी त्याचा वापर करतात.आपल्या देशातही (india), वाहनमालक वाहनामागे सायकल कैरिअर बसवून सायकल वाहून नेताना आढळतात. मोटार वाहन कायदा आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांमध्ये वाहनांमागे सायकल वाहक बसवण्याबाबत कुठेही बंधन नसले तरी, परिवहन विभाग आणि पोलिस विभागाच्या अंमलबजावणी पथकांकडून अशा वाहनांवर कारवाई केल्या जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा सायकल कैरिअरवर पुढील कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे परिपत्रकात सविस्तररित्या म्हटले गेले आहे.हेही वाचाअंधेरी-घाटकोपर मेट्रोवरील शटल सेवा तीन महिन्यांनंतर बंद2030 पर्यंत मुंबईत मेगा क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार
Home महत्वाची बातमी वाहनांच्या मागे सायकल कॅरिअर बसवणाऱ्यांवर कारवाई नाही
वाहनांच्या मागे सायकल कॅरिअर बसवणाऱ्यांवर कारवाई नाही
परिवहन आयुक्तांचे परिपत्रकानुसार जर सायकल कैरिअर (cycle carrier) अशा प्रकारे बसवलेले जेणेकरून वाहनामागील इतर वाहनांना कोणताही त्रास किंवा अडथळा निर्माण होणार नाही, तर अशा वाहनांवर (vehicles) कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. याबाबत सविस्तर माहिती परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी एका प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
पर्यावरणास अनुकूल, व्यायामाचे साधन असण्यासोबतच, कोणत्याही ठिकाणी सहज पोहोचता येते. यासाठी, जगातील अनेक देशांमध्ये बरेच लोक वाहन न वापरता सायकलचा वापर करतात, यासाठी अनेक वाहन मालक त्यांच्या वाहनामागे सायकल कैरिअर बसवून सायकल वाहून नेण्यासाठी त्याचा वापर करतात.
आपल्या देशातही (india), वाहनमालक वाहनामागे सायकल कैरिअर बसवून सायकल वाहून नेताना आढळतात. मोटार वाहन कायदा आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांमध्ये वाहनांमागे सायकल वाहक बसवण्याबाबत कुठेही बंधन नसले तरी, परिवहन विभाग आणि पोलिस विभागाच्या अंमलबजावणी पथकांकडून अशा वाहनांवर कारवाई केल्या जात असल्याच्या तक्रारी येत आहेत.
अशा सायकल कैरिअरवर पुढील कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे परिपत्रकात सविस्तररित्या म्हटले गेले आहे.हेही वाचा
अंधेरी-घाटकोपर मेट्रोवरील शटल सेवा तीन महिन्यांनंतर बंद
2030 पर्यंत मुंबईत मेगा क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार