ठाणे-बेलापूर रोडवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नवीन पुलाची योजना

नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) महापे मार्गे कोपरखैरणे (Koparkhairane) आणि घणसोली (Ghansoli) नोड्सला जोडणारा उड्डाणपूल बांधण्याची योजना आखत आहे. हा पूल परिसरातील वाहतूकीसाठी महत्त्वाची ठरेल. या प्रकल्पाची अंदाजे किंमत 24.23 कोटी रुपये आहे. सध्या, कोपरखैरणे नोडमध्ये प्रवेश करण्यासाठी वाहने कोपरखैरणे रेल्वे स्थानकाजवळील छोट्या भुयारी मार्गाचा वापर करतात. ठाणे (thane)-बेलापूर (टीबी) रस्त्यावरून घणसोली गावाला जोडणारा जुना रस्ताही आहे. तसेच पावसाळ्यात भुयारी मार्गातही पाणी साचते. या नवीन पुलामुळे हा प्रश्न सुटणार असून बेलापूर ते ठाणे दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. टीबी रोडवरील वाहनचालकांना या उड्डाणपूलाचा वापर करता येणार आहे. हा उड्डाणपूल ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर धीरूभाई अंबानी नॉलेज सिटी (DAKC) जवळ टीबी रोडवरील उड्डाणपूलाच्या शेवटी सुरू होईल. तसेच नवीन उड्डाणपुल कोपरखैरणे-महापे उड्डाणपूलालाही जोडणार आहे. सध्याचा महापे उड्डाणपूल एमआयडीसी परिसराला कोपरखैरणे आणि घणसोलीला स्वतंत्रपणे जोडला जातो. परंतु, टीबी रोडपासून नोड्सपर्यंत कोणताही थेट मार्ग नाही. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC)अखेर आर्म ब्रिज आणि रेल्वे ओव्हर ब्रिज (ROB) बांधण्याचा निर्णय घेतला आहे. महिन्याच्या अखेरीस निविदा प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. ते पूर्ण झाल्यानंतर, बांधकाम त्वरित सुरू होईल.हेही वाचा खारफुटी क्षेत्रांवर 669 कॅमेऱ्यांची नजर ठाणे-मुलुंड जलबोगद्याच्या 21 किलोमीटरच्या कामाला सुरुवात

ठाणे-बेलापूर रोडवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नवीन पुलाची योजना

नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) महापे मार्गे कोपरखैरणे (Koparkhairane) आणि घणसोली (Ghansoli) नोड्सला जोडणारा उड्डाणपूल बांधण्याची योजना आखत आहे. हा पूल परिसरातील वाहतूकीसाठी महत्त्वाची ठरेल. या प्रकल्पाची अंदाजे किंमत 24.23 कोटी रुपये आहे.सध्या, कोपरखैरणे नोडमध्ये प्रवेश करण्यासाठी वाहने कोपरखैरणे रेल्वे स्थानकाजवळील छोट्या भुयारी मार्गाचा वापर करतात. ठाणे (thane)-बेलापूर (टीबी) रस्त्यावरून घणसोली गावाला जोडणारा जुना रस्ताही आहे. तसेच पावसाळ्यात भुयारी मार्गातही पाणी साचते.या नवीन पुलामुळे हा प्रश्न सुटणार असून बेलापूर ते ठाणे दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. टीबी रोडवरील वाहनचालकांना या उड्डाणपूलाचा वापर करता येणार आहे. हा उड्डाणपूल ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर धीरूभाई अंबानी नॉलेज सिटी (DAKC) जवळ टीबी रोडवरील उड्डाणपूलाच्या शेवटी सुरू होईल.तसेच नवीन उड्डाणपुल कोपरखैरणे-महापे उड्डाणपूलालाही जोडणार आहे. सध्याचा महापे उड्डाणपूल एमआयडीसी परिसराला कोपरखैरणे आणि घणसोलीला स्वतंत्रपणे जोडला जातो. परंतु, टीबी रोडपासून नोड्सपर्यंत कोणताही थेट मार्ग नाही. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC)अखेर आर्म ब्रिज आणि रेल्वे ओव्हर ब्रिज (ROB) बांधण्याचा निर्णय घेतला आहे. महिन्याच्या अखेरीस निविदा प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. ते पूर्ण झाल्यानंतर, बांधकाम त्वरित सुरू होईल.हेही वाचाखारफुटी क्षेत्रांवर 669 कॅमेऱ्यांची नजरठाणे-मुलुंड जलबोगद्याच्या 21 किलोमीटरच्या कामाला सुरुवात

Go to Source