बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीशकुमारच
निर्णयाची अधिकृत घोषणा केली जाणार लवकरच
वृत्तसंस्था / पाटणा
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत देदिप्यमान विजय मिळविल्यानंतर आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राज्यात सरकार स्थापनेसाठी सज्ज होण्यास प्रारंभ केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा नितीश कुमार यांचीच नियुक्ती होणार आहे. या संबंधीची अधिकृत घोषणा येत्या एक दोन दिवसांमध्येच केली जाणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बिहारमधील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक शनिवारी नितीश कुमार यांच्या पाटणा येथील अधिकृत निवासस्थानी पार पडली. सरकार स्थापना आणि भावी सरकारचे स्वरुप यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली, अशी माहिती नंतर देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे दोन्ही मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत बिहारमध्ये भारतीय जनता पक्ष, संयुक्त जनता दल, लोकजनशक्ती (रामविलास पासवान), हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक पक्ष असे पाच पक्ष असून या सर्व पक्षांचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते. ही बैठक दोन तास चालली, असे स्पष्ट केले गेले.
सरकारच्या स्वरुपावर चर्चा
बैठकीत बिहारच्या आगामी सरकारच्या स्वरुपासंबंधीही प्राथमिक चर्चा करण्यात आली. बैठकीची अध्यक्षता अर्थातच, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली होती. त्यांनी प्रारंभी आघाडीतील सर्व पक्षांच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच बिहारच्या मतदारांचे आभार मानले. जनतेने मोठे उत्तरदायित्व आपल्या सरकारकडे दिले आहे. आम्ही ते पूर्ण आत्मविश्वासाने निभावणार आहोत. बिहारचा अधिकतम विकास हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आघाडीचा प्रचंड विजय
बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा परिणाम शुक्रवारी मतगणनेतंर घोषित करण्यात आला आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने प्रचंड यश प्राप्त केले आहे. विधानसभेच्या 243 स्थानांपैकी या आघाडीला 202 जागांची प्राप्ती झाली आहे. 2010 च्या निवडणुकीनंतरची ही आघाडीची सर्वाधिक ंसंख्या आहे. महागठबंधनच्या वाट्याला केवळ 35 जागा आहेत. एआयएमआयएमने ने 5 ते बहुजन समाज पक्षाने 1 जागा मिळविली आहे, असे घोषित करण्यात आले.
सरकार स्थापना त्वरित
बिहारच्या नव्या सरकारची स्थापना कधी होणार, याचा दिनांक अद्याप निर्धारित करण्यात आलेला नसला, तरी येत्या काही दिवसांमध्येच ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा शपथविधी होऊ शकतो. ते दहाव्यांना या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण करणार आहेत.
Home महत्वाची बातमी बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीशकुमारच
बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीशकुमारच
निर्णयाची अधिकृत घोषणा केली जाणार लवकरच वृत्तसंस्था / पाटणा बिहारच्या विधानसभा निवडणुकीत देदिप्यमान विजय मिळविल्यानंतर आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राज्यात सरकार स्थापनेसाठी सज्ज होण्यास प्रारंभ केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा नितीश कुमार यांचीच नियुक्ती होणार आहे. या संबंधीची अधिकृत घोषणा येत्या एक दोन दिवसांमध्येच केली जाणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांचा त्यांना पूर्ण […]
