बेळगाव-गोवा रस्त्याबाबत आज नितीन गडकरींकडे मांडणार समस्या
आमदार विठ्ठल हलगेकर गोव्यात घेणार भेट : पणजी येथे होणार बैठक
खानापूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात शनिवार दि. 23 रोजी कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र राज्यातील अंतर वाहतूक तसेच रस्त्याच्या समस्यांबाबत पणजी येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीला खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर हेही उपस्थित राहणार असून बैठकीत ते खानापूर-पणजी व्हाया रामनगर रस्त्याचे काम गेल्या सहा वर्षांपासून बंद होते. मागीलवर्षी पुणे येथील एम. व्ही. म्हात्रे या कंत्राटदाराला या रस्त्याच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यांनी या रस्त्याचे बांधकाम धिम्यागतीने सुरू ठेवल्याने हा रस्ताही पूर्ण होण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक बनलेले आहे. हा रस्ता येत्या दोन-तीन महिन्यांत होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हात्रे यांना गांभीर्याने सूचना करणे गरजेचे आहे. तसेच हेमाडगा-सिंधनूर हा रस्ताही गोव्यासाठी एकदम कमी अंतराचा आहे.
मात्र हा रस्ता जंगल प्रदेशातून जात असल्याने रस्त्याची वन खात्याने आडकाठी केलेली आहे. त्यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या रस्त्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच सध्या बेळगाव-गोवा व्हाया चोर्ला या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून वन खात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे थांबले आहे. या रस्त्याच्या बांधणीसाठी शेकडो कोटीचा निधी मंजूर होऊनदेखील बांधकाम बंद पडलेले आहे. बेळगाव आणि गोवा यांच्यातील अत्यंत कमी अंतराचा रस्ता असून गोव्याला मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. यासाठी रस्ता तातडीने होणे गरजेचे आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची समस्या सुटलेली नाही. या रस्त्यावरील समस्यांमुळे गेल्या पाच वर्षांत अनेकांना प्राण गमवावे लागलेले आहेत. या महामार्गाबद्दल आमदार विठ्ठल हलगेकर हे नितीन गडकरींकडे समस्या मांडणार आहेत.
15 कोटीचा आराखडा
सरकारच्या वन टाईम डेव्हल्पमेंट अंतर्गत खानापूर शहरातील चार किलोमीटरचा रस्ताही होणे आवश्यक आहे. मराठा मंडळ कॉलेज ते गोवा क्रॉस हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. यासाठी या रस्त्याचे वन टाईम डेव्हल्पमेंट प्रोग्रॅमअंतर्गत काम होणे गरजेचे आहे. याबाबत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी रस्त्याच्या बांधकामासाठी 15 कोटीचा आराखडा केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. या आराखड्याबाबत नितीन गडकरी यांनी लक्ष घालून मंजुरी देणे गरजेचे आहे. या रस्ताकामांबाबत गडकरी यांना लेखी निवेदनही देणार आहेत, असे हलगेकर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
Home महत्वाची बातमी बेळगाव-गोवा रस्त्याबाबत आज नितीन गडकरींकडे मांडणार समस्या
बेळगाव-गोवा रस्त्याबाबत आज नितीन गडकरींकडे मांडणार समस्या
आमदार विठ्ठल हलगेकर गोव्यात घेणार भेट : पणजी येथे होणार बैठक खानापूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात शनिवार दि. 23 रोजी कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र राज्यातील अंतर वाहतूक तसेच रस्त्याच्या समस्यांबाबत पणजी येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीला खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर हेही उपस्थित राहणार असून बैठकीत ते खानापूर-पणजी व्हाया रामनगर रस्त्याचे […]