केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिष्टमंडळाला दिलेला शब्द पाळला
बेळगाव-चोर्ला रस्त्याबाबत दिले होते निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-चोर्ला रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शनिवारी या कामाचा शुभारंभ केला. ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची सांबरा विमानतळावर भेट घेऊन या रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल माहिती दिली होती.
यावेळी येथे उपस्थित असलेले पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनासुद्धा किरण ठाकुर यांनी हा रस्ता नादुरुस्त असल्याने निर्माण झालेल्या समस्या आणि त्याचा व्यापार-उद्योगावर झालेला परिणाम याबद्दल माहिती दिली. तर सिटीझन्स कौन्सिल व ट्रेडर्स फोरमचे सतीश तेंडोलकर, लोकमान्यचे सीईओ अभिजीत दीक्षित, शिवप्रतिष्ठानचे किरण गावडे यांनी या रस्त्याच्या समस्येबद्दलची माहिती देणारे निवेदन पालकमंत्र्यांना दिले होते व लवकरात लवकर काम सुरू करावे, अशी विनंती केली होती.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या शिष्टमंडळाला दिलेला शब्द पाळून त्याबाबत त्वरित पावले उचलली. तसेच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी त्याची दखल घेतली. त्यामुळे या कामाचा शुभारंभ शनिवारी झाला आणि आता लवकरच उत्तम रस्त्यावरून ये-जा सुरू होणार आहे.
Home महत्वाची बातमी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिष्टमंडळाला दिलेला शब्द पाळला
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिष्टमंडळाला दिलेला शब्द पाळला
बेळगाव-चोर्ला रस्त्याबाबत दिले होते निवेदन प्रतिनिधी/ बेळगाव बेळगाव-चोर्ला रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शनिवारी या कामाचा शुभारंभ केला. ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची सांबरा विमानतळावर भेट घेऊन या रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल माहिती दिली होती. यावेळी येथे उपस्थित असलेले पालकमंत्री […]